हुडको प्राथमिक शाळा विद्यार्थ्यांनी साजरा केला शिक्षकदिन साजरा




स्वामी मुक्तानंद प्राथमिक विभाग  हुडको वसाहतीत विद्यार्थ्यांनी साजरा केला शिक्षकदिन साजरा 

येवला : प्रतिनिधी
 
येथील स्वामी मुक्तानंद प्राथमिक विभाग हुडको वसाहतीत विद्यार्थ्यांनी शिक्षकदिन साजरा केला.हुडको प्राथमिक शाळेतील चिमुकल्यांनी प्राथमिक शाळेत अध्यापनाचे कार्य करून शिक्षक दिन साजरा केला.कार्यक्रमाची सुरुवात  डॉ.राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली. विद्यार्थी शिक्षक-शिक्षिका गायत्री वखारे,संस्कृती सूर्यवंशी,धनश्री सोनवणे,गौरी पहिलवान,श्रद्धा मैले,अक्षदा पाबळे,शिवांजली थळकर,समीक्षा भागवत,सिद्धी शिंदे,जानवी कुद्रे,भक्ती निकम,दिशा धीवर,राशी साळवे,श्रेया सोनवणे,आदर्श हंडी,व्यंकटेश पहिलवान,साई दाणेज,उमेश अष्टेकर.मयूर लोणारी,अंजली दरवाया,स्वरा शिंदे, या विद्यार्थी शिक्षकांनी अध्यापन कार्यात सहभाग घेतला.विद्यालयातील शिक्षिका अनिता महाले,सुनिता घटे, यांनी आपल्या मनोगतातून शिक्षकाचे आपल्या जीवनातील महत्त्व विशद केले.त्यानंतर विद्यार्थ्यांनी आपल्या गुरुजनांचा सन्मान करून त्यांच्याप्रती आदर व्यक्त केला. 
=======================
फोटो कॅप्शन 
हुडको प्राथमिक शाळा विद्यार्थ्यांनी शिक्षकदिन साजरा केला प्रसंगी विद्यार्थी शिक्षक व अनिता महाले,सुनिता घटे

=======================
  



थोडे नवीन जरा जुने