पाटोदा जनता विद्यालयाचे विद्यार्थी कृष्णा शिंदे व अनिकेत बाविस्कर यांचे काव्यवाचन स्पर्धेत सुयश
येवला : प्रतिनिधी
पाटोदा येथिल म. वि. प्र समाज संचलित पाटोदा जनता विद्यालयाचे विद्यार्थी कृष्णा उदय शिंदे याने ज्ञानर्धिनी संस्था नाशिक व महात्मा गांधी विद्या मंदिर संस्था नाशिक आयोजित जनता विद्यालय येवला येथे झालेल्या जिल्हास्तरीय काव्य वाचन स्पर्धेत माध्यमिक गटात स्वरचित काव्य वाचन या प्रकारात द्वितीय क्रमांक मिळविला.तर अनिकेत बाविस्कर याने अन्य रचित काव्यवाचन या प्रकारात उत्तेजनेनार्थ पारितोषिक मिळवले.विजेत्या स्पर्धकांना प्राचार्य डॉ. भाऊसाहेब गमे,प्राचार्य डॉ निकम व नानासाहेब पटाईत यांचे हस्ते सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले.कृष्णा शिंदे यांची जिल्हास्तावरील स्पर्धेसाठी निवड झाली आहे. यशस्वी विद्यार्थ्यांना बाळासाहेब सोमासे यांचे मार्गदर्शन लाभले.यशस्वी विद्यार्थ्यांचे मविप्र संचालक रायभान काळे ,शालेय समिती अध्यक्ष सूर्यभान नाईकवाडे, रतन बोरणारे प्राचार्य एस. सी. रहाटळ ,पर्यवेक्षक डी. बी.पाटील आदींसह शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.
फोटो: जिल्हास्तरीय काव्य वाचन स्पर्धेत माध्यमिक गटात द्वितीय क्रमाकाचे पारितोषिक मान्यवरांच्या हस्ते स्विकारताना कृष्णा शिंदे.