येवला पैठणी पर्यटन केंद्राला राठोड यांची भेटयेवला पैठणी पर्यटन केंद्राला राठोड यांची भेट

येवला - प्रतिनिधी
येवला पैठनी पर्यटन केंद्र हे येवल्यातील पैठनी विनकर कारगिरांना आपल्या हक्काचे केंद्र असावे म्हणून तत्कालीन सार्वजनिक बांधकाम व पर्यटन मंत्री श्री छगनरावजी भुजबळ साहेब यांच्या संकल्पनेतून त्याची उभारणी झाली असून ते आज महाराष्ट्राच्या काना कोपऱ्यातिल पयर्टकांचे आकर्षण झाले आहे या केन्द्रास महाराष्ट्र राज्याचे पयर्टन विकास महामंडळाचे सह व्यवस्थापकीय संचालक श्री आशुतोष राठोड यांनी नुकतीच भेट दिली असता येवला पैठणी पर्यटन केंद्राची इमारत अतिशय सुंदर असून पैठणी केंद्र हे अतिशय सक्षम असल्याचे सांगितले त्यांनी येथील वेगवेगळ्या पैठणी साड्यांची पाहणी करुण माहिती जाणून घेतली पैठणी साडीवर हस्तकला व हातमागा च्या माध्यमातून अतिशय सुंदर नक्षीकाम रेखाटले जात असल्याने या सुंदर कलेला व त्याच्या कारागिरांना अजुन पर्यटन विकास महामंडळा कडून हे केंद्र जास्तीत जास्त विकसित होण्यासाठी पर्यटन मंत्री श्री जय कुमार रावल यांच्या मदतीने येथील इतर कालगुणांना वाव देऊन येथील प्रसिद्द पतंग उत्सवाच्या माध्यमातून पैठणी पतंग महोत्सवाच्या माध्यमातून अनेक विधायक स्तुत्य उपक्रमाच्या माध्यमातून राज्यातील पर्यटकांचे ते प्रमुख केंद्र व्हावे म्हणून महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळा तर्फे येवला पैठणी पर्यटन केंद्राच्या प्रसिद्धि साठी जाहिरातीच्या माध्यमातून व पर्यटन विभागाच्या वेगवेगळ्या उपक्रमाच्या माध्यमातून येवला पैठणी पर्यटन केंद्राचा उल्लेख व सहभाग करुण या ठिकाणी चर्चा सत्र घडवून आणून केंद्र सरकारच्या रेशम पर्यटन उपक्रमाचा फायदा या केंद्राला देऊन पारंपारिक रेशम पर्यटन व त्याला आधुनिकतेचा साज चढवून त्याचा सुंदर मिलाप करुण येथील सर्व समस्यांचे लवकरात लवकर निराकरण करण्याचे आश्वासन सहाय्यक संचालक श्री आशुतोष राठोड यांनी दिले या प्रसंगी येवला पैठणी पर्यटन केंद्राच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला या प्रसंगी पैठणी क्लस्टरचे कार्यकारी संचालक प्रविण पहिलवान,विनोद बाकळे,संजय विधाते,सुरेश कुंभारे,सुनिल भावसार,दत्ता मुंगीकर,राकेश कुंभारे उपस्थित होते     

थोडे नवीन जरा जुने