रूचिका लभडेची स्केटिंगमध्ये विभागस्तरावर निवड


रूचिका लभडेची स्केटिंगमध्ये विभागस्तरावर निवड
येवला: प्रतिनिधी
 राजे संभाजी स्टेडियम नाशिक येथे दि.२४ व २५ रोजी आयोजित जिल्हास्तरीय स्केटिंग स्पर्धेत मुक्तानंद विद्यालयाची विद्यार्थीनी व आर्यन स्केटिंग क्लबची खेळाडू रूचिका दत्तात्रय लभडे हिने नेत्रदीपक कामगिरी करत प्रथम क्रमांक मिळवत विभाग स्तरावर खेळण्यासाठी निवड झाली.यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी खिल्लारे,नाशिक जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशनचे सचिव सविता बुलंगे यांनी रूचिकाचा यथोचित सत्कार केला.यावेळी प्रशिक्षक सचिन आहिरे,पालक दत्तात्रय लभडे, सुधिर आहेर व खेळाडू उपस्थित होते.
जिल्हा क्रीडा व युवक सेवा संचलनालय महाराष्ट्र राज्य पुणे,जिल्हा क्रीडा अधिकारी व जिल्हा क्रीडा परिषद नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने  आयोजित जिल्हास्तर क्रीडा स्पर्धा २०१८-२०१९ स्पर्धा दि.२४ व २५ रोजी राजे संभाजी स्टेडीयम नाशिक येथे पार पडल्या. रोलर स्केटींग प्रकारात ११ वर्षाआतील वयोगटात स्वामी मुक्तानंद विद्यालयाची विद्यार्थीनी व  आर्यन स्केटींग क्लब येवलाची खेळाडू  रुचिका लभडे हिने प्रथम क्रमांक मिळवून नंदुरबार येथे विभाग स्तरीय स्पर्धेसाठी खेळण्यासाठी तिची निवड झाली.तिला क्रीडाप्रशिक्षक सचिन आहिरे यांचे मार्गदर्शन लाभले. जिल्हास्तरावर नेत्रदीपक कामगिरी करून विभाग स्तरावर खेळण्यासाठी निवड झाल्याने स्वामी मुक्तानंद विद्यालयाचे प्राचार्य सी.आर.खैरे,क्रीडाशिक्षक एम.एम.वखारे,एम.एस.पहिलवान, ए.बी.भागवत,शिक्षकवृंद आदींनी अभिनंदन केले.रुचिकास विभागीय पातळीवरील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

 
फोटोखाली -  रुचिका लभडे हिने जिल्हास्तरावर स्केटिंगमध्ये प्रथम क्रमांक मिळविल्याने नाशिक येथे सत्कार करतांना
 जिल्हा क्रीडा अधिकारी खिल्लारे,नाशिक जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशनचे सचिव सविता बुलंगे सोबत प्रशिक्षक सचिन आहिरे, पालक दत्तात्रय लभडे , सुधिर आहेर आदी.

थोडे नवीन जरा जुने