येवला तालुका शासकीय क्रिडा स्पर्धेत तीन हजारावर खेळाडुंचा सहभागयेवला तालुका शासकीय क्रिडा स्पर्धेत तीन हजारावर खेळाडुंचा सहभाग

 येवला : प्रतिनिधी
येवला तालुका शासकीय शालेय क्रिडा स्पर्धेत दहा खेळांच्या स्पर्धा येथील क्रिडा संकुलात संपन्न झाल्या. या स्पर्धेमध्ये ३ हजार २७४ खेळाडूंनी सहभाग नोंदविला. फुटबॉल, कुस्ती, खो-खो, कराटे, क्रिकेट, व्हॉलीबॉल, कबड्डी, बुद्धीबळ आदींसह योगासन स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेचे आयोजन तालुका क्रिडा अधिकारी पल्लवी धात्रक, तालुका क्रिडा संयोजक नवनाथ उंडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. स्पर्धा यशस्वीतेसाठी शिरीष नांदुर्डीकर, सागर मुटेकर, सागर लोणारी, मंदार खैरे, स्वप्नील बाकळे, साहेबराव घुगे, शिवाजी साताळकर, विनोद निकम, धर्मराज शिरसाठ, शैलेज घाडगे, बाळू पैठणकर, शैलेश गायकवाड, दिलीप कचरे, राजेंद्र जाधव, किरण कुलकर्णी यांनी परिश्रम घेतले.


थोडे नवीन जरा जुने