संतोष विद्यालयाचे कबड्डी,कुस्ती,कराटे,क्रिकेटच्
येवला : प्रतिनिधी
बाभूळगाव येथील संतोष श्रमिक माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयाला तालुकास्तरीय शालेय कबड्डी स्पर्धेमध्ये विजेतेपद मिळाले आहे.या संघासह फुटबाल,कराटे,कुस्ती व क्रिकेटचे संघाची देखील जिल्हास्तरावर निवड झाली आहे
येथील जनता विद्यालयाच्या प्रांगणात एकोणावीस वर्षाखालील शालेय कबड्डी स्पर्धा पार पडल्या स्पर्धेचे उद्घाटन कला व वाणिज्य जनता महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.भाऊसाहेब गमे यांच्या हस्ते करण्यात आले.तालुक्यातील विविध विद्यालयांचे संघ स्पर्धेत सहभागी झाले होते. या स्पर्धेत झालेल्या मुलांच्या अंतिम सामन्यात संतोष श्रमिक विद्यालयाचा संघ व सावरगाव विद्यालयाच्या संघात चुरशीचा सामना झाला.चपळाईने खेळ करत बाभूळगावच्या संघाने सावरगाव संघाचा तब्बल १७ गुणांच्या फरकाने पराभव केला व स्पर्धेत विद्यालयास विजेतेपद मिळाले.
शालेय तालुकास्तरीय स्पर्धेत १९ वर्षाखालील मुले, मुलींचा संघाने तर क्रिकेट संघाने विजेतेपद पटकावले.कुस्तीत ९६ किलो वजनी गटात बारावीतील प्रणव पवार याची जिल्हास्तरावर निवड झाली आहे.
कराटे स्पर्धेत १४ वर्षाखालील गटात भैरवी गायकवाड,१७ वर्ष गटात जयदीप पाटील तर १९ वर्षाखालील गटात प्रतीक्षा नंदनवार यांनी विजय मिळवला.व्हालीबाल स्पर्धेत मुलींचा संघ उपविजेता ठरला मात्र मुलांच्या संघाने विजेतेपद मिळवत जिल्हास्तरावर धडक मारली आहे.खेळाडूंना क्रीडा शिक्षक सागर मुटेकर,राहुल तेलोरे,कैलाश गायकवाड यांचे मार्गदर्शन लाभले.
संघाच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष आमदार नरेंद्र दराडे,शिक्षक आमदार किशोर दराडे,प्रशासकीय अधिकारी समाधान झाल्टे,प्राचार्य गोरक्षनाथ येवले,उपप्राचार्य आप्पासाहेब कदम,विभाग प्रमुख संतोष विंचू,सेमीचे विभाग प्रमुख विठ्ठल परदेशी,दत्ता खोकले,प्रदीप पाटील आदींनी खेळाडूंचे अभिनंदन केले.
फोटो Yeola 9_4
येवला : संतोष श्रमिक माध्यमिक विद्यालयाचा तालुकास्तरीय शालेय कबड्डीत विजयी झालेला संघ.समवेत शिक्षक.