बैल धुण्यासाठी गेलेला मुलगा पाटात वाहून गेला

बैल धुण्यासाठी गेलेला मुलगा पाटात वाहून गेला

येवला : प्रतिनिधी

 पाटोदा येथे बैल धुण्यासाठी गेलेला मुलगा पाटात वाहून गेला असून शोधकार्य सुरू आहे याबाबत अधिक माहिती अशी की पाटोदा येथील आडगाव रस्त्यावर आण्णासाहेब तनपुरे यांची वस्ती असून शेजारीच पालखेड कालवा आहे सध्या कालव्याला मोठ्या प्रमाणात पाणी सुरू असून आज पोळा असल्याने दुपारी बाराच्या सुमारास बैलाना घेऊन गोकुळ आण्णासाहेब तनपुरे (१७) हा पाटाच्या कडेला बैल धूत होता मात्र अचानकपणे एका बैलाने गोकुळला पाटाच्या पाण्यात ओढले पोहता येत नसल्याने गोकुळ पाण्यात वाहून गेला सोबत लहान मुले असल्याने त्यांनी हा प्रकार घरच्यांना सांगीतल्यानंतर गोकुळला शोध सुरू झाला मात्र साडेतीन तास उलटूनही गोकुळचा कोणताही तपास लागू शकलेला नाही पाटात मोठ्या प्रमाणात पाणी असल्याने शोधकार्यात अडथळे येत होते मात्र आता पाटाचे पाणी इतरत्र वळवण्यात आले असून ग्रामस्थांच्या मदतीने मोठ्या प्रमाणात शोधकार्य सुरू आहे  
थोडे नवीन जरा जुने