एस. एन. डी. महाविद्यालयात हिंदी सप्ताह साजरा




एस. एन. डी. महाविद्यालयात हिंदी सप्ताह साजरा

येवला : प्रतिनिधी

 एस. एन. डी. कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय येथे १४ ते १९ सप्टेंबर पर्यंत हिंदी दिवस सप्ताह साजरा करण्यात आला.आज हिंदी दिवस समारोह या कार्यक्रमासाठी के. जे. सोमैया महाविद्यालय कोपरगाव येथील डॉ. जे. एस. मोरे हे प्रमुख पाहुणे म्हणून लाभले.अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही. एन. ढाकरे यांनी भूषावले. सर्व मान्यवरांचा सत्कार समारंभ झाला. विद्यार्थांनी काव्यवाचन केले. त्यानंतर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. जे. एस. मोरे यांनी हिंदी साहित्यातील कबीर, मीराबाई, रहीम, बिहारी, यांच्या दोहे च्या माध्यमातून विद्यार्थांना अनमोल असे मार्गदर्शन केले. तसेच हिंदी भाषा चा उपयोग आपल्या जीवनामध्ये कसा उपयुक्त आहे हे विद्यार्थांना समजावून  सांगितला.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही. एन. ढाकरे यांनी आपल्या मनोगतात आमीर खुसरो च्या पहेलीया, मुँखरिया, तसेच हिंदी भाषा चे महत्व विद्यार्थांना सांगितले.विद्यार्थांनी हिंदी भाषा आत्मसाथ करावी अशी अपेक्षा आपल्या मनोगतातून व्यक्त केली. या कार्यक्रम प्रसंगी सुत्रसंचालन प्रा. गौरख काथापुरे यांनी केले व आभार  प्रा. एस. टी. खैरनार यांनी केले.

प्रा. शिवाजी बेंद्रे, प्रा. मढवई दिपक, प्रा. गणपत धनगे, प्रा. संदीप ठाकरे, प्रा. संतोष आहेर, प्रा. बाबासाहेब गाडेकर,प्रा. माधव बनकर, प्रा. विजय झाल्टे, प्रा. ललित घाडगे, प्रा.वसिम कुरेशी, प्रा. अमोल पवार, प्रा. सुनिल पवार, प्रा. संजय करंजकर,प्रा. सोमनाथ डुबे, श्री.दिपक जाधव, प्रा. गौरी जोशी, प्रा.नीता मोरे, प्रा. अश्विनी मोरे, प्रा. जयश्री आहेर, प्रा.सविता गांगुर्डे, प्रा.सुवर्णा खापटे,प्रा. माया शिंदे, प्रा. भागवत रचना, प्रा. श्वेता आरणे, प्रा. अण्णा व्हडगळ, प्रा. लक्ष्मण देवडे, प्रा. म्हसे महेंद्र, प्रा. तृप्ती काळगे, प्रा. कविता साळवे,ज्ञानेश्वर चव्हाण,योगेश भावसार,शरयु भागवत,संतोष अहिरे,किरण मुंढे,गणेश पगारे आदी उपस्थित होते.


09/19/18, 4:25:25 PM

थोडे नवीन जरा जुने