सुनेस त्रास देणाऱ्या सासरच्या मंडळीना सहा महिन्यांचा तुरुंगवास येवला न्यायालयाने सुनावली शिक्षा

सुनेस त्रास देणाऱ्या सासरच्या मंडळीना सहा महिन्यांचा तुरुंगवास
येवला न्यायालयाने सुनावली शिक्षा 
येवला -   (सुदर्शन खिल्लारे )
महालखेडा ता येवला येथील सौ कविता दिगंबर नागरे हल्ली मुक्काम नाशिक या महिलेने आपल्या सासरच्या मंडळी विरोधात येवला तालुका पोलीस ठाणे येथे दि १०/१०/२००२  मध्ये तक्रार दिली होती त्या केस चा निकाल देतांना येवला  न्यायालयाने सासरच्या सर्व आरोपींना शिक्षा  सुनावली 
अधिक माहिती अशी कि कविता हिचा विवाह दिगंबर नागरे यांच्या सोबत २००१ साली झाला होताविवाह नंतर काही दिवसातच कविताला सासरच्या लोकांनी  गहाण ठेवलेली जमीन सोडवण्यासाठी तसेच कविताची मुलगी सोनाली हिच्या उपचारासाठी माहेरून पैसे घेवून यावे या साठी तगादा सुरु केलामात्र कविताच्या माहेर ची परिस्थिती बेताचीच असल्याने तिने या गोष्टीला सुरवातीला नकार दिला कविता ऐकत नसल्याने सासरच्या लोकांनी तिला मानसिक आणि शारीरिक त्रास देण्यास सुरवात केली मारहाण करणे ,शिवीगाळ करणे उपाशी पोटी ठेवने या सर्व त्रासाला कंटाळून कविता ने येवला तालुका पोलीस ठाणे येथे रीतसर तक्रार दाखल केली त्या नुसार तपासी अंमलदार के आर महाले ( सहायक पोलीस निरीक्षक) यांनी भा.द.वी कलम ४९८अ,३२३,५०४,५०६,सह ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करून योग्य तपास करून येवला न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले .त्या नुसार आरोपी सीताबाई पुंजा नगरे,सुरेश रामभाऊ उदावंत,व शकुंतला सुरेश उदावंत यांना दोषी ठरवत सुमारे सोळावर्षानंतर न्यायव्यवस्थेने कविताला न्याय देत आरोपींना सहा महिन्यांची शिक्षा प्रत्येकी ५ हजार दंड आणि दंड न भरल्यास   २ दिवसांची साध्या कारावासाची शिक्षा सुनावली वरील खटला लवकरात लवकर निकाली निघावा या साठी सरकारी पक्षा तर्फे ऍड डी. आर.जयकर तसेच येवला तालुका पो स्टे च्या महिला कोर्ट कर्मचारी पो कॉ उषा आहेर ,गीता शिंदे व लिपिक संदीप मेढे यांनी मदत केली
थोडे नवीन जरा जुने