मनमाड परिमंडलातील कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन मुख्य अभियंता ब्रिजपालसिंह जनवीर यांनी घेतली भेट,कडक कारवाईचा इशारा

मनमाड परिमंडलातील कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन

मुख्य अभियंता ब्रिजपालसिंह जनवीर यांनी घेतली भेट,कडक कारवाईचा इशारा

 

येवला :  प्रतिनिधी

देवरगाव येथे वीज कंपनीच्या अभियंत्यासह कर्मचार्यांना झालेल्या मारहाणीच्या घटनेचे प्रतिसाद आज दुसऱ्या दिवशी उमटले. मनमाड परिमंडलातील कर्मचाऱ्यांनी आज सकाळपासूनच कामबंद आंदोलन केले.दरम्यान नाशिक परिमंडळाचे मुख्य अभियंता ब्रिजपालसिंह जनवीर यांनी येथे भेट देऊन कर्मचाऱ्यांना पाठिंबा दर्शविला. यापुढे अधिकारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत अशी अप्रिय घटना घडल्यास तेथील वीजपुरवठा बंद ठेवण्याचा इशारा जनवीर यांनी दिला.

काल देवरगाव येथे वीजचोरी पकडली म्हणून कार्यकारी अभियंता सुरेश जाधव यांच यांच्या अंगावर रॉकेल ओतण्याचा तर इतर कर्मचाऱ्यांना शिवीगाळ व मारहाणीचा प्रकार काल घडला.यातील आरोपी ज्ञानेश्वर गोराडे व इतर दोघांना पोलिसांनी उशिरापर्यंत अटक केलेली नसल्याने कालच कर्मचारी संतप्त झाले होते.आज मनमाड उपविभागातील नांदगाव व येवला तालुक्यातील सुमारे ३५० कर्मचाऱ्यांनी सकाळपासूनच कामबंद आंदोलन सुरू केले होते. यामुळे अनेक ठिकाणी वीजपुरवठा देखील खंडित झालेला होता.तर या घटनेनंतर देवरगाव येथील वीजपुरवठा बंदच ठेवण्यात आला आहे.

बुधवारी दुपारी मुख्य अभियंता जनवीर यांनी देवरगाव येथे भेट दिल्यानंतर येथील कार्यालयात अधिकारी कर्मचाऱ्यांची द्वारसभा घेतली.घडलेल्या घटनेचा निषेध नोंदवत याची दखल थेट मुंबईपर्यत घेण्यात आली असून सर्व अधिकारी कर्मचाऱयांच्या सोबत असल्याचे ते म्हणाले. ग्राहकांना चंगली सेवा द्या मात्र वीजचोरी व अनधिकृत जोडण्या कदापीही सहन केला जाणार नाही असा इशारा त्यांनी दिला.ग्रामीण भागात वीजचोरीचे प्रमाण अधिक असून यामुळे रोहित्र जाळणे व खंडित वीज पुरवठा होतोय,याला संबंधित वीज चोरत जबाबदार आहे.यामुळे कंपनीचे मोठे नुकसान होत असल्याने वीज चोरीवर कठोर कारवाईसाठी पथके नेमल्याचेही त्यांनी सांगितले. सामान्य नागरिकांच्या सेवेसाठीच आम्ही वसुली व चोरीवर नियंत्रण आणतोय मात्र त्याला जर अशा पद्धतीने उत्तर दिले जात असेल तर आम्ही कदापिही सहन करणार नाही असेही जनवीर म्हणाले.यावेळी उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी विश्वास पाटील, मालेगाव मंडळाचे अधीक्षक अभियंता संदीप दरवडे,मनमाड विभागाचे कार्यकारी अभियंता राजाराम डोंगरे, जनसंपर्क अधिकारी विजयसिंह दुधभाते,येथील उपकार्यकारी अभियंता राजेश पाटील,मंगेश प्रजापती,उपकार्यकारी अभियंता सुरेश शिंदे,मधुकर साळुंखेमहेश जगतापसहायक अभियंता दिनेश गवळीसहायक अभियंता

अर्जुन गीते,कविता फड,सुनील सातदिवे,ज्ञानोबा राठोड आदि यावेळी उपस्थित होते.

सर्व संघटना आक्रमक

महावितरण कंपनीच्या अधिकारी व कर्मचार्‍यांवर झालेल्या प्राणघातक हल्याचा येवल्यातील महावितरण अधिकारी व कर्मचारी कामगार कृती समितीच्या वतीने जाहिर निषेध नोंदवण्यात आला आहे.याबाबत आज संयुक्त विज अधिकारी व कर्मचारी कामगार कृती समितीच्या वतीने नाशिक परिमंडळाचे मुख्य अभियंता ब्रिजपालसिंह जनवीर,तहसीलदार व पोलीस निरीक्षकांना निवेदन देऊन आरोपी व त्यांच्या सहकार्‍यांना तात्काळ अटक करावी अशी मागणी करण्यात आली.यापूर्वी देखील चार-पाच तक्रारी पोलिसांकडे दाखल करण्यात आलेल्या आहेत.मात्र यासंदर्भात कोणतीच कारवाई करण्यात आलेली नाई.कर्मचाऱ्यांवर हल्ले व शिवीगाळ करणाऱ्या प्रकरणांवर कारवाई न झाल्यास संघटना कुठल्याही क्षणी कामबंद आंदोलन करेल तसेच विज पुरवठा खंडीत झाल्यास किंवा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण झाल्यास त्यास सर्वस्वी पोलीस प्रशासन जबाबदार राहील असा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे

थोडे नवीन जरा जुने