पालखेड च्या आवर्तनासाठी येवल्यातील शेतकरी आक्रमक जायकवाडी साठी थेंबभर ही पाणी न जाऊ देण्याचा निर्धार रब्बीचे आवर्तन पूर्ण क्षमतेने मिळविण्यासाठी उभारणार जन आंदोलन पालखेड डावा कालवा कृती समितीची स्थापना



पालखेड च्या आवर्तनासाठी येवल्यातील शेतकरी आक्रमक

जायकवाडी साठी थेंबभर ही पाणी न जाऊ देण्याचा निर्धार

रब्बीचे आवर्तन पूर्ण क्षमतेने मिळविण्यासाठी उभारणार जन आंदोलन

पालखेड डावा कालवा कृती समितीची स्थापना


 येवला : प्रतिनिधी

येवला तालुका सतत दुष्काळी असूनही शासनाच्या चुकीच्या माहितीमुळे जायकवाडीला पाणी देता यावे, याकरीता येथील हक्काच्या पाण्यावर डल्ला मारुन ते पाणी कारखानदारांना वापरण्यासाठी येवला तालुक्याचे नाव दुष्काळी तालुक्यांच्या यादीतुन वगळण्यात आले आहे. मात्र, शासनाचा हा डाव येथील शेतकरी हाणून पाडल्याशिवाय राहणार नाही, असे प्रतिपादन जलहक्क संघर्ष समितीचे संयोजक भागवतराव सोनवणे यांनी केले. 
येवल्यात पालखेड चे पाणी पेटले असून जायकवाडी ला पाणी सोडण्याचे संकट आपल्या मुळावर येऊन येवला तालुक्यातील शेती उध्वस्त करण्याचा घाट घातला जात असून सरकारची ता मागे सुडाची भावना असली जनता आता आपला लढा स्वतः च लढण्यास सज्ज झाली असून त्या साठी पालखेड डावा कालवा कृती समिती स्थापन करण्यात आली आहे.
जलहक्क संघर्ष समितीचे संयोजक भागवत राव सोनवणे हे पालखेड कालवा कृती समितीचे निमंत्रक असून पालखेड किमी 85 ते किमी 110 वरील सर्व शेतकरी बांधव या कृती समितीचे सदस्य राहणार आहेत.
एरंडगाव गाव येथील पालखेड वसाहतीच्या आवारात कृती समितीची पहिली बैठक संपन्न झाली असून हक्काच्या पाण्यासाठी पहिली ठिणगी पडली आहे...

पालखेड कालवा कृती समितीच्या  आजच्या स्थापनेच्या दिवशी लाभ क्षेत्रातील शेकडो शेतकऱ्यांनी एरंडगाव येथे जमून सरकारचा निषेध करून हक्काचे पाणी मिळालेच पाहिजे अशा  घोषणा दिल्या.

पालखेड चे रब्बी साठी चे पाणी सिंचन आवर्तन न्याय पद्धतीने मिळण्यासाठी टोकाचा संघर्ष करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.
 
येवला तालुका दुष्काळी जाहीर करण्यासाठी शासनाच्या विरोधात  चुकीचे पर्जन्य मान दाखवून दुष्काळी यादीतून वगळल्या च्या विरोधात जनहित याचिका दाखल करण्यात येणार असून
पालखेड धरण समूहातून जायकवाडी साठी थेंबभर पाणीही सोडू न देणार नाही अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे.

पालखेड डावा कालवा लाभक्षेत्रातील शेतकर्‍यांची महत्वपूर्ण बैठक आज रविवार दि. २१ रोजी सकाळी ९.३० वाजता एरंडगाव येथील पालखेड डावा कालवा कार्यालयाच्या प्रांगणात संपन्न झाली. यावेळी रब्बी हंगामासाठी लवकरात लवकर दोन आवर्तने पूर्ण क्षमतेने मिळण्यासाठी लढा उभारणे, पालखेड धरण समुहातील पाणी जायकवाडीसाठी जाऊ नये यासाठी न्यायालयीन लढाई लढणे, जलहक्क समिती अंतर्गत पालखेड डावा कालवा कृती समिती स्थापन करणे आदींबरोबरच इतर विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी प्रहार शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष हरिभाऊ महाजन, शेतकरी संघटनेचे अनिस पटेल, राष्ट्रीय कॉंग्रेसचे प्रांतीक सदस्य एकनाथ गायकवाड, शेरुभाई मोमीन, पत्रकार सुनील गायकवाड आदींनी मार्गदर्शन केले. जलहक्क समिती अंतर्गत पालखेड डावा कालवा कृती समिती स्थापन करण्यात आली असल्याची माहिती या समितीचे निमंत्रक म्हणून भागवतराव सोनवणे यांनी दिली आहे. पालखेड कालवा कृती समितीच्या आजच्या स्थापनेच्या दिवशी लाभ क्षेत्रातील शेकडो शेतकर्‍यांनी एरंडगाव येथे जमून सरकारच्या विरोधात घोषणा दिल्या.  
यावेळी सोनवणे म्हणाले की, येवला तालुका दुष्काळाच्या यादीत न येण्याचे महत्वाचे कारण, शासन दरबारी असलेल्या पर्जन्य मापकाच्या नोंदीपासून शासनाकडे चुकीची माहिती पुरविण्यात आली आहे. पर्जन्यमापक यंत्र येवले शहरातील तहसिल कार्यालय आवारासह जिल्हा परिषदेच्या मुखेड, पाटोदा, अंदरसूल, नगरसून या चार गटात बसविण्यात आले आहे. मात्र, त्यावरील नोंदी न घेता  येवले शहरातील तहसिल कार्यालय आवारातील पर्जन्यमापकावरील नोंदी घेतल्या गेल्याने ही चुकीची माहिती शासनाकडे पुरविण्यात आली आहे. या नोंदीवरुन तालुक्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याची माहिती पुरविण्यात आली आहे. वस्तुत: ही माहिती येवला शहरात असलेल्या महसूल मंडळाच्या पर्जन्यमापकावरुन घेतली आहे. त्यामुळे केवळ शहरासह नजीकच्या गावचा पाऊस गृहित धरुन येवल्याला दुष्काळाच्या यादीतुन वगळले आहे. वास्तविक नगरसूल, अंदरसूल या महसूल मंडळातील सर्व जलाशय कोरडे असून नदीपात्रही कोरडे आहे. सरासरीच्या निम्माही पाऊस या परिसरात झालेला नाही. पर्जन्य मानाच्या निकषानुसार नगरसूल व अंदरसूल मंडळातील प्रत्येक गाव दुष्काळी आहे. या परिसरात भिषण पाणी टंचाई, चारा टंचाई जाणवत आहे. अशा परिस्थितीत पालखेड डाव्या कालव्याचे दोन आवर्तने ही आपल्या हक्काची असून ती मिळालीच पाहिजे. या हक्काच्या पाण्यासाठी रस्त्यावर चक्काजाम करण्याबरोबरच आपण न्यायालयातही धाव घेणार असल्याचे भागवतराव सोनवणे यांनी सांगितले. 
पालखेडचे रब्बीसाठीचे पाणी सिंचन आवर्तन न्याय पद्धतीने मिळण्यासाठी टोकाचा संघर्ष करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. येवला तालुका दुष्काळी जाहीर करण्यासाठी शासनाच्या विरोधात चुकीचे पर्जन्यमान दाखवून दुष्काळी यादीतुन वगळल्याच्या विरोधात जनहित याचिका दाखल करण्यात येणार असून पालखेड धरण समूहातून जायकवाडीला थेंबभर पाणीही सोडून देणार नाही, अशी भूमिका शेतकर्‍यांनी घेतली आहे. 


याप्रसंगी प्रभाकर रंधे, रतन मढवई, सुनील साताळकर,  भगवान ठोंबरे, माजी सरपंच नवनाथ लभडे, विठ्ठलं वाळके, सीताराम गायकवाड, बाळासाहेब गायकवाड, वसंत झांबरे, महेबूब शेख, रावसाहेब आहेर, अनिल गायकवाड, प्रकाश साताळकर, बाळासाहेब साताळकर, रावसाहेब झांबरे, सुधाकर ठोंबरे, श्याम गुंड, शिवाजी खापरे, निवृत्ती मढवई आदींसह 
यावेळी जलहक्क संघर्ष समिती चे भागवतराव  सोनवणे , प्रहार शेतकरी संघटनेचे हरिभाऊ महाजन, काँग्रेस चे प्रांतिक सदस्य एकनाथ गायकवाड , राष्ट्रवादी चे युवा नेते भगवान ठोंबरे , शिवसेनेचे प्रसिद्धी प्रमुख शाम गुंड , शेतकरी संघटनेचे अनिस पटेल, नवनाथ लभडे,
यादवराव झाम्बरे, आदींसह शेतकरी उपस्थित होते

थोडे नवीन जरा जुने