दत्तू भोकनळच्या भेटीने भारावले चिमुकले!

दत्तू भोकनळच्या भेटीने भारावले चिमुकले!

येवला : प्रतिनिधी
तळेगाव रोहीचे भारतीय सैन्य दलात सेवेत  असलेले व देशाचे नाव रिओ ऑलम्पिकमध्ये गाजवलेले, अशियाना स्पर्धेतील सुवर्ण पदक विजेते,
आंतरराष्ट्रीय रोईंग पटू  दत्तू भोकनळ यांचा येवला तालुक्यातील जि.प. प्राथमिक शाळा पिंपरी या शाळेत सत्कार करण्यात आला.
  याप्रसंगी शाळेतील विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांनी भरपूर अभ्यास करा, तसेच भरपूर खेळा. 
आणि  व्यायामाचे महत्त्व, शारीरिक स्वच्छता, त्यासाठी हात धुणे, त्यामुळे शरीर निरोगी राहून सुदृढ होते. अशा मोजक्याच शब्दात मनोगत व्यक्त करून मुलांना संदेश देऊन प्रेरीत केले. 

 किर्तीने मोठे असलेले दत्तू जन्मभूमीत आल्यावर सामान्य शेतकऱ्यासारखे मका सोंगणी करून कुटुंबियास हातभार लावून काळ्या आईची सेवा केली.
त्यांच्या या भेटीने विद्यार्थी आनंदून गेले.
याप्रसंगी दत्तू भोकनळ यांचे स्वागत मुख्याध्यापक नारायण डोखे यांनी केले. माजी सरपंच अरुण पानसरे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
गोरख संत,भगवान ठोबरे,शाम गुंड यांनी ही सुंदर भेट घडवून आणली.नाना गोराणे यांनी सूत्रसंचालन केले तर रामनाथ भडांगे यांनी उपस्थितांचे आभार मानले. 
 याप्रसंगी शिक्षणप्रेमी , शाळा समितीचे अध्यक्ष सुनील गुंड, प्रीतम कुदळ,राजु नाईकवाडे,राजु कुदळ,योगेश कुदळ,योगेश पानसरे, आदी  उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी योगेश कुलट आदींनी प्रयत्न केले.
थोडे नवीन जरा जुने