माणसांमधली माणूसकी..माणसांकडूनच जपली जावी...
येवला : प्रतिनिधी
मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह चालविणारे सोमनाथ नामदेव ठाकरे हे राजापूर ( ता.येवला ) येथील सोनतळे वस्तीवरील रहिवासी... दि.२२ रोजी हे कुटुंबीय मोलमजुरीसाठी शेतात गेले असता अचानकपणे त्यांच्या झोपडीला आग लागली..या आगीत ठाकरे यांची झोपडी भस्मसात झाली..' वृत्तपत्रात ' आगीत झोपडी खाक या मथळ्याखाली बातमी छापून आली. हि बातमी नांदगाव येथील रितेश गुप्ता यांच्या वाचनात आली..त्याने संदीप जेजुरकर, डॉ.उदय मेघावत, सिद्धार्थ पवार , प्रा.शिवाजी पाटील यांच्याशी त्या बातमी बद्दल चर्चा करत आपल्याला छोटीशी मदत त्या कुटुंबियांना करता येईल का याबाबत मत जाणून घेतले.. क्षणाचाही विलंब न करता सर्वांनीच होकार दिल्याने मग साहित्य गोळा करायला सुरुवात केली..संसारोपयोगी स्टीलचे भांडे ( ताट, तांब्या, कढाई, तवा, ग्लास, प्लेट, वाट्या ) भाजीपाला, प्लास्टिक बरण्या, महिनाभर पुरेल एवढा किराणा, धान्य तसेच २१०० रुपये रोख अशी मदत ठाकरे कुटुंबीयांच्या हाती राजापूर येथे जाऊन सुपूर्द केली..सारं काही उध्वस्त झाल्यानंतर अचानकपणे झालेल्या मदतीने ठाकरे कुटुंबियांचे अश्रू अनावर झाले..होतं नव्हतं ते सगळं जळून राख झालं.मात्र तुमच्या या मदतीने आम्हाला पुन्हा उभारी मिळेल.आम्ही कधीच तुमचे उपकार विसरणार नाही.अशी भावना ठाकरे कुटुंबीयांनी यावेळी व्यक्त केली..