एक तास वाचन उपक्रमाद्वारे डॉ.कलामांच्या कार्याला उजाळा ...

एक तास वाचन उपक्रमाद्वारे डॉ.कलामांच्या कार्याला उजाळा ....
   येवला : प्रतिनिधी 
          बनकर पाटील पब्लिक स्कूलमध्ये मिसाईल मँन अशी ओळख असणारे भारताचे भूतपूर्व राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचा जन्मदिन वाचन दिवस म्हणून तर हात स्वच्छ करण्याचे प्रात्यक्षिक दाखवून स्वच्छ हात धुवा दिवस साजरा करण्यात आला.
 यावेळी शाळेचे कार्यकारी संचालक तथा नगरसेवक  प्रविण बनकर व प्राचार्य पंकज निकम  यांच्या हस्ते डॉ.कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. सद्या सभोवताली असणारे साथीचे आजार यामुळे आपण हात स्वच्छ करणे किती महत्वाचे आहे  हे स्मिता भावसार यांनी सांगितली व विद्यार्थांनी हात कधी व कसे स्वच्छ करावे? याची प्रात्यक्षिके इ.६ वी च्या विद्यार्थ्यानी नाटिकेतून दाखवली व यानंतर सर्व विद्यार्थ्यांनी स्वच्छ हात धुण्याची कृती करून शपथ घेतली. रुपाली चव्हाण यांनी विविध प्रश्नांच्या माद्यमातून डॉ. कलाम यांच्या विषयी माहिती व वाचन संस्कृती  आज लोप पावत आहे आणि वाचाल तर वाचाल हि काळाची गरज लक्षात घेऊन वाचनाचे महत्व पटवून दिले. धकाधकीच्या जीवनात वाचन कुठेतरी लयास जात असतांना अश्या उपक्रमांनी नव्या पीडिला प्रेरणा मिळावी ह्यासाठी शाळेने विद्यार्थ्यांना वेगवेगळे गोष्टीची पुस्तके उपलब्ध करून देत एक तास वाचनाचा हा उपक्रम यादिवशी राबवला. यावेळी शाळेचे सर्व शिक्षक व शिकेतर कर्मचारी उपस्थित होते. 
थोडे नवीन जरा जुने