एन्झोकेम विद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा




एन्झोकेम विद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा 
 
येवला: प्रतिनिधी
दृकश्राव्य प्रसार माध्यमांच्या आहारी न जाता विद्यार्थ्यांनी कसदार पुस्तकांचे वाचन करुन वाचन संस्कृती प्रगल्भ करावी, असे प्रतिपादन कला अध्यापक प्रकाश सोनवणे यांनी केले.येथील एन्झोकेम विद्यालयात  माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस वाचन प्रेरणा दि म्हणून साजरा करण्यात आला. 
त्याप्रसंगी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, ग्रंथ हेच गुरु आहेत, वाचाल तर वाचाल, वाचनातुन आयुष्याला आकार येतो. बुद्धी स्थिर राहते. ध्यान लागते. आकलन शक्ती वाढते.अभ्यासाची गोडी लागते. म्हणून वाचन कौशल्य विकसीत करुन गुणवत्ता सिद्ध करावी, असेही ते म्हणाले. अध्यक्षस्थानी प्राचार्य दत्ता महाले होते.उपप्राचार्य संजय बिरारी पर्यवेक्षक किशोर जगताप,आदींनी प्रतिमा पुजन केले. 
यावेळी पुष्पा कांबळे,चंपा रणदिवे,पुष्पा आहेर,विना पराते,सरस्वती नागपुरे,स्वाती सानप,नम्रता ससाणे,सौ जवळेकर अंकुश ललवाणी,सुभाष नागरे, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. सुत्रसंचालन दत्तकुमार उटावळे यांनी केले.
_______________________________________________________________________________________
फोटो कॅप्शन:
वाचन प्रेरणादिननिमित्ताने एन्झोकेम विद्यालयात वाचनात सहभागी झालेले विद्यार्थी 


थोडे नवीन जरा जुने