येवला औद्योगिक वसाहतीची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न.....


येवला औद्योगिक वसाहतीची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न.....

येवला : प्रतिनिधी

येवले औद्योगिक सहकारी वसाहतीची 35 वी वार्षिक सर्वसाधारण सभा सौरउर्जा प्रकल्प उभारणीसह पाणीपुरवठा योजनासह विविध योजनेला सभासदांनी मंजुरी देत विषय पत्रिकेवरील सर्व विषयांना मंजुरी दिली.

संस्थेच्या सभागृहात वसाहतीचे अध्यक्ष अनिल तथा लालाभाऊ कुक्कर यांच्या अध्यक्षतेखाली सभा  संपन्न झाली. यासभेत संचालक मंडळाने ठरवलेल्या सौर उर्जा प्रकल्प उभारण्यासाठी संचालक मंडळाने पुढाकार घेऊन लवकरात लवकर प्रकल्प मार्गी लावावा, तसेच औद्योगिक वसाहतीत पिण्यासाठी 38 गाव पाणीपुरवठा योजनेचे पाणी लवकरच सुरु करण्यासाठी प्रयत्न करावे अशी सूचना सभासदांनी केली.

या सभेसाठी जेष्ठ नेते अॅड. माणिकराव शिंदे, जेष्ठ नेते अंबादास बनकर, अध्यक्ष अनिल कुक्कर, उपाध्यक्ष दत्तकुमार महाले, संचालक भोलानाथ लोणारी, अॅड.नवीनचंद्र परदेशी, सौ. जयश्री काळे, श्रीमती. सुवर्णा चव्हाण,शाम कंदलकर,विष्णू खैरनार सतीश छतानी आदीसह सर्व संचालक उपस्थित होते. 

यावेळी जेष्ठ संचालक अंबादास बनकर यांनी औद्योगिक वसाहतीअंतर्गत येणाऱ्या जमिनीची मोजणी अवश्य करावी.केवळ दक्षिणेकडील जागेची मोजणी करावी.अंगणगाव ग्रामपंचायतीने वसाहतीची जागा देवून केलेल्या सहकार्याबद्दल स्थानिक पातळीवरील युवकांना रोजगार कसा मिळेल याचा विचार वसाहतीने करावा अशी मागणी बनकर यांनी केली.संस्थेची विजेची गरज लक्षात घेऊन तसेच विजेचे वाढते दर विचारात घेऊन 6 केव्हिएचा सौर उर्जा प्रकल्प टाकण्यासाठी संचालक मंडळाने शिफारस केली. या कामासाठी अंदाजे 5 लाख रुपयाचा खर्च आहे.असल्याचे चेअरमन अनिल कुक्कर यांनी सांगितले.  हा प्रकल्प उभारण्यासाठी सभेने संचालक मंडळास सर्वाधिकार दिले असून प्रकल्प लवकरात लवकर मार्गी लावण्याची सूचना करण्यात आली.नफ्यातून संस्थेच्या सभेसह अन्य कामासाठी सभागृह बांधण्यात यावे अशी मागणी सभासदांनी केली.यास मंजुरी देण्यात आली. संस्थेचे कामकाज एकमताने एकदिलाने चालवावे यासाठी वसाहतीची निवडणूक बिनविरोध केली.असल्याचे सांगून माणिकराव शिंदे यांनी वसाहतीचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.   

यावेळी धनजंय फुलपगार, विक्रम गायकवाड,राजेंद्र पवार, चंदन पटेल, ब्रिजलाल छ्तानी, सुभाष सुरसे, सुनील टाक, अनिल मुथा, सुंदरलाल वाघ, दिलीप तक्ते, अरुण भावसार, प्रवीण पहिलवान, वसंत खैरनार, शाम कंदलकर, ज्ञानेश्वर गाडेकर आदीसह सभासदांनी चर्चेत भाग घेतला.यावेळी माणिकराव शिंदे,अंबादास बनकर,सुंदरलाल वाघ यांचा सत्कार करण्यात आला.सभेचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचलन वसाहतीचे उपाध्यक्ष दत्तकुमार महाले यांनी केले. तर आभार अध्यक्ष अनिल कुक्कर यांनी मानले. संस्थेचे व्यवस्थापक सोपान पैठणकर यांनी सभेचे नियोजन केले.

वसाहतीत 51 प्लॉट आहेत,केवळ 17 उद्योग चालू आहेत.काही उद्योजकांनी वर्षानुवर्ष उद्योग सुरु न करता केवळ जागा अडवून ते थकबाकीत आहेत त्यांच्यावर कायद्यानुसार कारवाई करावी.प्लॉट ताब्यात घ्यावेत.आणि होतकरू व इच्छुक उद्योजकांना संधी देण्याची मागणी सभासदांनी केली.त्यानुसार कार्यवाही करण्याचा निर्णय घेण्यात आला.याबाबत सर्वाधिकार संचालक मंडळाला देण्यात आले. वसाहतीत असणाऱ्या तक्रारी निवारण करण्यासाठी माणिकराव शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाची समिती स्थापन करून चार सदस्सीय समिती स्थापन करून वसाहतीच्या हिताचे निर्णय घेण्यात यावे असा ठराव देखील संमत करण्यात आला.पोटनियम दुरुस्ती बाबत समिती स्थापन करून त्या मंजुरीसाठी विशेष सभा बोलवावी असा निर्णय घेण्यात आला.  

====================================================

फोटो कॅप्शन - येवला औद्योगिक वसाहतीच्या सभेत बोलताना जेष्ठ नेते माणिकराव शिंदे समवेत मंचावर उपस्थित जेष्ठ नेते अंबादास बनकर,वसाहतीचे अध्यक्ष अनिल कुक्कर, उपाध्यक्ष दत्ता महाले, भोलानाथ लोणारी,नवीनचंद्र परदेशी,जयश्री काळे आदि. 



   
 
थोडे नवीन जरा जुने