जगदगुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या वतीने आज रक्तदान शिबीर

जगदगुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या वतीने आज रक्तदान शिबीर

येवला – प्रतिनिधी

जगदगुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या वतीने दि.२ ऑक्टोंबर रोजी येवला ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयामध्ये  रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले आहे. २०१६ मध्ये नरेंद्र महाराज संस्थान तर्फे भारतातील लष्करी जवानांसाठी ७८४८ आणी महाराष्ट्र शासनाच्या रक्तपेढ्याकरीता ६५,४८२ रक्तबाटल्या दान करण्यात आल्या होत्या. यावर्षी सदर रक्तदान शिबिरातून संकलित होणारे रक्त हे महाराष्ट्र शासनाच्या रक्तपेढींना देण्यात येणार आहे. तरी येवलेकरांनी या उपक्रमास पाठिंबा देत रक्तदानाच्या महान कार्यात सहभाग नोंदवण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे.

 

थोडे नवीन जरा जुने