दुष्काळी मंडळाना मोफत पास योजनेचा तत्काळ लाभ द्यावा विध्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी आमदार दराडे यांची परिवहन मंत्र्याकडे मागणी




दुष्काळी मंडळाना मोफत पास योजनेचा तत्काळ लाभ द्यावा

विध्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी आमदार दराडे यांची परिवहन मंत्र्याकडे मागणी

 

येवला  : प्रतिनिधी

शासनाने दुसऱ्या टप्प्यात दुष्काळ जाहीर केलेल्या राज्यातील २६८ महसूल मंडलातील विद्यार्थ्यांना मोफत पास योजने पासून वंचित राहण्याची वेळ आली आहे.शाळा सुरु झाल्याने या विद्यार्थ्यांवर आर्थिक भुर्दंड पडू नये यासाठी घोषणेनुसार मोफत पास योजनेचा लाभ तत्काळ द्यावा अशी मागणी आमदार नरेंद्र दराडे यांनी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्याकडे मुंबई येथे भेट घेऊन केली आहे.

शासनाने पहिल्या टप्प्यात राज्यातील १८० व जिल्ह्यातील आठ तालुके दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर केले आहे. त्यातील विध्यार्थ्यांना मोफत पास योजनेचा लाभ देणे सुरु झालेले असून मंडले मात्र या लाभापासून वंचित राहिले आहेत.दुसर्या टप्प्यात ७५ मिलीमीटर पेक्षा कमी पाऊस पडलेल्या जिल्ह्यात कळवण, नवी बेज, मोकभागी, दिंडोरी तालुक्यातील दिंडोरी, मोहाडी, वरखेडा, निफाडसह रानवड, चांदोरी, देवगाव, सायखेडा, नांदूर व येवल्यातील नगरसूल, अंदरसूल, पाटोदा, सावरगाव व जळगाव नेऊर या १७ मंडळात दुसऱ्या यादीत दुष्काळ जाहीर झाला आहे. दुष्काळाचा पहिला फायदा म्हणून विद्यार्थ्यांना प्रवासी सवलत पास मोफत मिळणार आहेत.

खेडयापाडयातून शहराकडे शिक्षण घेण्यासाठी येणाऱ्या उच्च माध्यमिक व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी ६६.६७ टक्के सवलत देण्यात येते.शासनाच्या निर्णयामुळे ती पुर्णतः मोफत करण्यात आली असून १५ नोव्हेंबर ते १५ एप्रिल पर्यंत ही योजना चालू राहणार आहे.या मंडलांबाबत परिवहन महामंमंडळाने अधिसूचना जारी न झाल्याने विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळत नाही.अद्याप तालुक्यातील मंडलांतील विध्यार्थ्यांना लाभ देण्याबाबत वरिष्ठ कार्यालयाकडून आदेश प्राप्त न झाल्याने लाभ दिला जात नसल्याचे आगार प्रशासन सांगत असल्याचे दराडे यांनी यावेळी सांगितले.तसे पत्रही रावते यांना दराडे यांनी दिले. दरम्यान रावते यांनी दराडेकडून यासंदर्भात सविस्तर माहिती घेतली. व  तत्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना संबंधितांना करण्याचे आश्वासन दिले.

फोटो Yeola 24_6

मुंबई : दुष्काळ जाहीर केलेल्या महसूल मंडलातील विद्यार्थ्यांना मोफत पास योजनेचा लाभ देण्याची मागणी

परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्याकडे करतांना आमदार नरेंद्र दराडे.


थोडे नवीन जरा जुने