समन्वय, संघटन आणि सक्षमीकरण या त्रिसुत्रिवरच मराठा समाजाची भविष्यातील वाटचाल ... कोटमगांव येथील मराठा संघटन परिषदेत तरुणांचा निश्चय-----

समन्वय, संघटन आणि  सक्षमीकरण या त्रिसुत्रिवरच मराठा समाजाची भविष्यातील वाटचाल ...
कोटमगांव येथील मराठा संघटन परिषदेत तरुणांचा निश्चय-----

येवला : प्रतिनिधी

 कोटमगाव (देवीचे):सकल मराठा समन्वय समितीच्या वतीने बैठक घेण्यात आली. यावेळी समितीने मराठा समाजाला आरक्षण मिळून देण्यासाठी बलिदान देणाऱ्या मराठा बांधवांना श्रध्दांजली अर्पण करून सभेची सुरवात झाली प्रसंगी मराठा समाजासाठी एक त्रिसूत्री तयार करण्यात आली .समन्वय, संगठन,आणि सक्षमीकरण यासाठी पुढील काळात काम केले जाईल असे समितीच्या वतीने ठरविण्यात आले. कारण आरक्षण मिळाले तरी नोकरी लगेच मिळणार नाही त्यामुळे मराठा समाजातील तरुणांनी व्यवसाय सुरू केले पाहिजे व स्वतः सक्षम होऊन समाज सक्षम करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे असे आव्हान केले.
शासनाने मराठा समाजाला आरक्षण दिले ते टिकवण्यासाठी आपण कायदेशीर बाबींवर कटीबद्द राहावे.प्रसंगी तालुक्यातील समन्वय समितीचे प्रा संतोष मढवई यांनी कॅम्प संदर्भात सर्व माहिती दिली.
 प्रमोद देवढे सर यांनी सर्व मराठा तरुणाच्या मनातील अरक्षणसंदर्भातील शंकांचे निरसन करून तरुणांना प्रेरित केले. 
देवीदास गुडघे यांनी समाजबांधवांनी या लढ्यात सक्रीय योगदान देण्यासंबंधी अवाहन केले.
 मंगेश कदम सर यांनी समन्वय, संगठन,आणि सक्षमीकरण या त्रिसूत्री चे अनावरण करून भविष्यात मराठा समाजाला या त्रिसूत्रीची किती गरज आहे हे पटवून दिले.
यानंतर पुढे मराठा समाजातील तरूणांना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी तालुक्यातील सर्व राजकिय नेते ,मराठा संघटना,शैक्षणिक संस्था, अधिकारी,डॉक्टर, वकील, यांना वेळोवेळी मदत करण्याचे आवाहन करण्यात आले.
यावेळी गावातील  हरिभाऊ कोटमें ,सचिन ढमाले, हितेश नवल,
 पुष्पक लहरे, कृष्णा कोटमें,जितेंद्र लहरे, विकास लहरे, जयंत लहरे आदी सर्व मराठा बांधव उपस्थित होते
शेवटी  साईनाथ मढवई यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.
थोडे नवीन जरा जुने