मुलगी पाहायला गेले पण लग्नच लावून आले.

मुलगी पाहायला गेले पण लग्नच लावून आले.
विवाह सोहळ्याचे अवास्तव खर्च टाळून वनडेत विवाह सोहळा- उपसभापती रूपचंद भागवत यांच्या मध्यस्थीस यश.
हुंडा मानपान आणि लग्न खर्च टाळून निखिलने केला विवाह.


येवला : प्रतिनिधी
  तालुक्यातील गवंडगाव येथील प्रगतशील शेतकरी रामदास भागवत यांचे चिरंजीव निखिल भागवत तसेच तालुक्यातील रेंडाळे येथील प्रगतिशील शेतकरी बाळासाहेब आहेर यांची कन्या शितल यांचे विवाह जुळवणी कामी गवंडगाव येथील नातेवाईक भाऊबंद, रामदास भागवत, उपसभापती रूपचंद भागवत हे रेंडाळे येथे गेले असता निखिल साठी मुलगी शितल पाहून झाले उपसभापती यांनी जागेवरच साखरपुडा करून घ्यावा असे सुचविले. साखरपुड्याची सर्व तयारी झाली त्यातच सर्व पाहुणे भाऊबंद जमा झाली आहे आणि विवाह सोहळ्याचा पुढे येणारा अवास्तव खर्च टाळून आजच विवाहसोहळा वर करून घ्यावा असे पंचायत समिती उपसभापती भागवत यांनी सुचवले. त्यानुसार सर्व पाहुण्यांनी, दोन्हीही परिवारातील सर्वांनी सहमती दर्शवली त्यानुसार आज एका दिवसात विवाह संपन्न झाला

येवला तालुक्‍यात चालू वर्षी दुष्काळ पडलेला आहे. लग्न समारंभामध्ये मुलीचे वडिलांचा व मुलाचे वडिलांचा भरपूर प्रमाणात खर्च होतो. तो खर्च टाळून दोघांच्या संसारासाठी उपयोगात आणता येऊ शकतो. याकरिता हा विवाह सोहळा एका दिवसात उरकून घेण्याची विनंती वधू-वर पक्षास केली असता त्यांनी ती मान्य करून विवाह सोहळा संपन्न केला. त्याबद्दल त्यांचे आभार आणि यापुढेही लग्न सोहळ्यातील अवास्तव खर्च टाळून असेच विवाह सोहळा वधू-वर पक्षांनी करावे- श्री रूपचंद भागवत संघटक शिवसेना येवला लासलगाव विधानसभा तसेच उपसभापती पंचायत समिती येवला.

याप्रसंगी कारभारी भागवत, खंडेराव भागवत, नामदेव भागवत, रामचंद्र भागवत, सखाराम भागवत,  पोपट भागवत, ज्ञानेश्वर भागवत, सुरेश भागवत, दिलीप भागवत, येशवंत भागवत, फकिरा भागवत, विठ्ठल भागवत,चांगदेव भागवत, नारायण भागवत  कैलास भागवत,  अप्पासाहेब भागवत,  रवींद्र भागवत, रामदास भागवत, राधाकृष्ण भागवत, केशव भागवत,  प्रमोद भागवत, निलेश भागवत, संतोष भागवत,
विजय जानराव,न्यानेश्वर आहेर,जालिंदर खोकले,जनार्धन खोकले, नारायण खोकले,अशोक आहेर,माधवराव आहेर,बाबासाहेब खोकले, भाऊसाहेब आहेर,केलास खोकले,विजय जानराव, पपु जानराव , सपंत आहेर उपस्थित होते .
थोडे नवीन जरा जुने