येवल्यात नायलॉन मांजाची होळी .... नायलॉन मांजा विक्री व वापर करणाऱ्यावर कारवाईची मागणी



येवल्यात नायलॉन मांजाची होळी .... नायलॉन मांजा विक्री व वापर करणाऱ्यावर कारवाईची मागणी  

येवला : प्रतिनिधी

मकर संक्रांत उत्सवाचे काळात येवला शहर व तालुक्यात मोठ्या प्रमाणावर पतंग उडविल्या जातात.  त्यामध्ये सध्या वापर होत असलेला घातक अशा नायलॉन मांजाचा वापर होत असुन त्यामुळे अनेक अपघात घडतात. अशा या घातक मांजावर बंदी घालण्यासाठी येवल्यात शिवसेना व शहरातील नागरिकांच्या वतीने आज ता. २ रोजी शहरातील सराफ बाजार येथे नायलॉन मांजाची होळी करुन आंदोलन केले.  मागणी मान्य न झाल्यास १४ जानेवारी रोजी येवला शहर पोलीस ठाणे समोर बेमुदत उपोषणाचा इशारा शिवसेना शहर संघटक धिरज परदेशी यांनी यावेळी दिला. 

येवला शहरात तीन दिवस चालणार्‍या ह्या संक्रांत उत्सावाचे दरम्यान पतंग उडविणासाठी अधिक उत्तम दर्जाचा दोरा वापरण्यासाठी चढाओढ सुरु असते.  सक्रांत उत्सव हा येवल्यात शेकडो वर्षापासुन मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो.  कोणतेही कष्ट न करता नायलॉनचा हा तयार दोरा उपलब्ध झाल्याने नागरीकांकडुन त्याचा वापर होऊ लागला आहे.  ह्या घातक व न तुटणार्‍या दोर्‍यामुळे अनेक अपघात घडुन गळ्याला, नाकाला व चेहर्‍यावर दुखापती होण्याची संख्या वाढत असुन पशुपक्ष्यांना देखील आपला जीव गमवावा लागत आहे.  ह्या अशा घातक मांजाची विक्री व वापर बंद करण्यासाठी पोलीसांनी तात्काळ कारवाई करुन मांजा विक्री करणारे व वापरणारे अशा दोघांवर कडक कारवाई करण्याची मागणी करीत शिवसेनेने येथील सराफ बाजार येथे आंदोलन करत नायलॉन मांजाची होळी केली.

यावेळी अमित अनकाईकर, अल्ताफ शेख, आदम मोमीन, शेरू मोमिन, अल्ताफ शेख, नितीन जाधव, शाकीर शेख, रुपेश घोडके, इब्राहिम सय्यद, सोमनाथ काथवटे, आशिष अनकाईकर, रफिक शेख, मोफीज अत्तार, दीपक काथवटे, विशाल वर्मा, बंडू कोतवाल आदींसह शहरवासीय व शिवसेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.

..

थोडे नवीन जरा जुने