दिंडी निघणार आहे काव्य संग्रहाला राज्यस्तरीय पुरस्कार जाहिर

  दिंडी निघणार आहे काव्य संग्रहाला राज्यस्तरीय पुरस्कार जाहिर

 येवला - प्रतिनिधी
   येथील ग्रामीण कवी, पत्रकार  प्रा. शिवाजी भालेराव यांच्या दिंडी निघणार आहे या काव्य संग्रहास वाड्:मयीन चळवळीशी बांधीलकी जपणारा प्रतिष्ठेचा मा. कुसुमावती भिमराव  जाधव राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार जाहिर झाला आहे.
मातोळा जिल्हा बुलडाणा ( विदर्भ ) येथील श्री छत्रपती शाहु महाराज शिक्षण संस्थेच्या वतीने राज्यातील दर्जेदार काव्य संग्रहाला हा पुरस्कार दिला जातो. या पुरस्काराचे वितरण २९ जानेवारी रोजी दुपारी ११ वाजता मान्यवर साहित्तिकांच्या  हस्ते समारंभपूर्वक  बुलडाणा येथे एका विशेष समारंभात करण्यात येणार असल्याची माहिती संयोजक कवयित्री विजया गायकवाड यांनी दिली आहे. रोख रक्कमेसह, सन्मान चिन्ह, सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरुपआहे. या आगोदर दिंडी निघणार आहे, या काव्य संग्रहाला राज्यस्तरीय जे.के. जाधव साहित्य पुरस्कार,गिरणा गौरव प्रतिष्ठानचा शब्दपेरा पुरस्कार तसेच  बडोदा येथील मराठी वाड्:मयीन परिषदेच्या वतीने देण्यात येणारा अभिरुची गौरव पुरस्कार मिळाला आहे.
  शिवाजी भालेराव हे धामोडे ता. येवला येथील मातोश्री पार्वताबाई ठमाजी गायकवाड संचलित गुरुदत्त माध्यमिक विद्यालयात शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या या सन्मानाबद्दल संस्थापक तथा बाजार समितीचे माजी सभापती रामदास गायकवाड, माजी सैनिक लहानु येवले,भागवत गायकवाड, सरपंच नानासाहेब भड, मुख्याध्यापक अर्जून घोडेराव, शशिकांत गायकवाड, पत्रकार संघाचे अध्यक्ष राकेश गिरासे, सुनील गायकवाड, संतोष विंचू, दत्ता महाले, अविनाश पाटील, विलास कांबळे, विलास पगारे, संजय लोणारी, मनोज पटेल, रविंद्र करमासे, कुमार गुजराथी यांनी अभिनंदन केले आहे.

थोडे नवीन जरा जुने