कंचनसुधा विद्यालयात ब्लॅक अॅण्ड व्हाईट डे साजरा
येथील कंचनसुधा इंग्लिश मिडीयम स्कुलच्या प्रि प्रायमरीच्या विद्यार्थ्यांनी शाळेत ब्लॅक अॅण्ड व्हाईट डे अनोख्या पद्धतीने साजरा केला. विद्यार्थ्यांना विविध रंगांचे आकलन व्हावे करीता हा अनोखा उपक्रम शाळेत राबविण्यात आला.
यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी तसा वेश परिधान करुन शाळेत येतांना आपल्या सोबतच्या वस्तु, दप्तर तसेच टिफिन मधील खाद्य पदार्थ देखील ब्लॅक अॅण्ड व्हाईट रंगात आणुन आपला उत्सफुर्त सहभाग नोंदवला. शिक्षिका प्रतिक्षा पाटील व राधीका भावसार यांनी विद्यार्थ्यांना या ब्लॅक अॅण्ड व्हाईट डे बाबत महत्व पटवुन देत विद्यार्थ्यां सोबत ह्या ब्लॅक अॅण्ड व्हाईट डे च्या अनुषंगाने वेगवेगळे खेळ देखील खेळण्यात आले. याप्रसंगी शाळेचे संस्थापक अजय जैन, समन्वयक अक्षय जैन यांनी मुलांचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या. हा अनोखा डे साजरा करणे कामी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षीका यांचे मोलाचे सहकार्य लाभले.