विश्वलताच्या विद्यार्थ्यांची मांजरपाडा प्रकल्पास भेट.विश्वलताच्या विद्यार्थ्यांची मांजरपाडा प्रकल्पास भेट.

येवला : पुढारी वृत्तसेवा विश्वलता कला, वाणिज्य विज्ञान महाविद्यालयामधील भूगोल विभागाच्या वतीने शैक्षणिक तसेच भौगोलिक अभ्यास पर्यटन भेटीचे आयोजन करण्यात आले होते. मांजरपाडा प्रकल्प हा महाराष्ट्रातील अद्वितीय प्रकल्प असून मांजरपाडा या आदिवासी बहुल तसेच भौगोलिक दृष्ट्या अतिशय खडतर स्थानावरून दुसऱ्या राज्यात वाहून जाणाऱ्या पाण्याचा अनेक वळण बंधाऱ्याच्या माध्यमातून प्रवाह थेट नाशिक जिल्ह्याच्या येवला या टोकापर्यंत आणण्याचा अतिशय जटिल प्रकल्प त्यावेळच्या सार्वजनिक बांधकाम तथा विद्यमान अन्न पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या पुढाकाराने पुर्णत्वास आणण्यात आलेला आहे. अभियात्रिकी जलव्यवस्थापन क्षेत्रात या प्रकल्पाच्या चर्चा देखील बऱ्याच प्रमाणात सुरू असतात, देवसाने वळण योजनेच्या माध्यमातून पश्चिम वाहिनी पार नदीचे पाणी विशिष्ट प्रकारच्या एक किलोमीटर आणि नऊ किलोमीटर असलेल्या बोगदयांद्वारे ह्या पाण्याचे वितरण कॅनाल च्या माध्यमातून नाशिक जिल्ह्याचा पूर्व दिशेला गोदावरी खोऱ्याची तूट भरून निघणार आहे. महाविद्यालयीन अभ्यासक्रमात पर्यटन, क्षेत्रभेट, तथा औद्योगिक शैक्षणिक भेटीला खूपच महत्व असून मांजरपाडा येथे विद्यार्थ्यांनि प्रत्यक्ष स्थानावर जाऊन तेथील भौगोलिक परिस्थिती अभ्यासली त्यावर विचारपूर्वक संशोधन करून तेथील खडक , माती आणि इतर घटकांचे नमुने गोळा करून त्यावर पद्धतशीरपणे अभ्यास अहवाल सादर केला. मांजरपाडा प्रकल्पाचे असंख्य वळण बंधारे, प्रकल्पाची भिंत, भव्य बोगदे, मुख्य सांडवा, कॅनॉलचे अस्तरीकरण ई.बाबी विद्यार्थ्यंनी विज्ञानवादी दृष्टिकोन ठेवून अनुभवल्या. महाविद्यालयातील भूगोल विभागाच्या वतीने या पर्यटन सहलीचे आयोजन करण्यात आले.यात महाविद्यालयातील एफ वाय बी.सी. एस तसेच एस वाय बी सी एस मधील जवळपास ४१ विद्यार्थी विद्यार्थीनी सहभागी झाले होते. त्या प्रकल्पावर गेल्यानंतर तेथिल पाट बंधारे प्रकल्प अधिकारी इंजिनियर श्री.सुभाष पगारे यांनी प्रकपाची सखोल व संपुर्ण माहिती विद्यार्थ्यांना सांगितली तसेच विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांचे, शंकाचे पूर्ण समाधान करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आणि अभियांत्रिकीचे हे खूपच सुंदर उदाहरण असल्याचे त्यांनी आपल्या माहितीत नमूद केले. महत्वपूर्ण माहिती विद्यार्थ्यांनी आपल्या डायरीत उतरवून घेतली. एकंदरीत या एकदिवसीय प्रकल्प क्षेत्र भेटीत विद्यार्थ्यांना अनेक नवीन गोष्टी शिकावयास तसेच अभ्यासासाठी मिळाल्या. या मांजरपाडा क्षेत्र भेटीचे आयोजनासाठी संस्था संचालक श्री भूषण लाघवे, प्रा.गणेश बुरुंगले, प्रा.अक्षय पानगव्हाणे, प्रा.मयुरी पाटील, प्रा.कामिनी संवस्तकर यांनी विशेष प्रयत्न केले.
थोडे नवीन जरा जुने