येवल्यात संत शिरोमणी नामदेव महाराज युवा सेवा समितीच्या वतीने मराठी नववर्ष निमित्ताने कोरोणा मुक्तीची गुढी उभारली


येवल्यात संत शिरोमणी नामदेव महाराज युवा सेवा समितीच्या वतीने मराठी नववर्ष निमित्ताने कोरोणा मुक्तीची गुढी उभारली

येवला : पुढारी वृत्तसेवा

 भारतीय संस्कृतीमध्ये गुढी पाडवा महत्वाचा सण आहे. मराठी नवीन वर्षाची सुरवात या दिवसाने होते. या दिवशी प्रत्येक मराठी माणुस त्यांच्या दारी गुढी उभारुन हा दिवस साजरा करतात. येवला येथील सेवाभावी संस्था संत नामदेव महाराज युवा सेवा समिती व खटपट युवा मंच यांच्या वतीने मराठी नववर्षाचे स्वागत व गुढीपाडवा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी प्रसिध्द व्यापारी सोमनाथ हाबडे, श्री संत नामदेव शिंपी समाजाचे अध्यक्ष सुहास भांबारे व उपाध्यक्ष नंदकुमार लचके यांच्या शुभहस्ते प्रभु रामचंद्रांच्या प्रतिमेची पुष्पाहार अर्पण करुन पुजन करण्यात आले. शिंपी गल्ली कॉर्नर येथे ही भव्य 15 फुट उंचीची "कोरोना मुक्तीची"  उभारण्यात आलेली गुढी सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. गुढीची विधिवत पुजन मान्यवरांच्या हस्ते करुन गुढी उभारण्यात आली. 
तसेच मराठी नवीन वर्ष दिनी शनिमंदिर परिसरातील व इतर परिसरातील कष्टकरी महिलांना मिठाई, 51 साड्यांचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करुन या मराठी नवीन वर्षानिमित्त सामाजिक बांधीलकी जोपासली. या प्रसंगी मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले व समितीच्या आणि मंचच्या विधायक कार्याचे कौतूक केले. खटपट युवा मंचचे अध्यक्ष व कार्यक्रमाचे आयोजक मुकेश लचके यांनी प्रास्ताविक केले तर राम तुपसाखरे यांनी आभार मानले. या कार्यक्रमास प्रसिध्द व्यंगचित्रकार प्रभाकरजी झळके सर, नंदलाल भांबारे, कैलास बकरे, रविंद्र हाबडे, राजेश माळवे, अमर छतानी, दत्ता नागडेकर, योगेश लचके, गोकुळ गांगुर्डे, योगेश सोनवणे, पांडुरंग खंदारे, सोमनाथ शिंदे, पुरुषोत्तम रहाणे, अमोल लचके, संदिप लचके, प्रकाश खंदारे, राजेंद्र वारे, तुषार भांबारे, बाळु गायकवाड, ज्ञानेश टिभे, संतोष टिभे, गणेश मोतीवाले, कमलेश लचके, पंकज शिंदे, संजय गायकवाड, सुहास खंदारे, जयवंत खांबेकर, महेद्र गुप्ता, वरद लचके, गणेश लचके, अनिल टिभे, नितिन सयाम, राकेश खैरे, सोमनाथ लकारे, इ. सह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
थोडे नवीन जरा जुने