सकल मराठा कार्यकर्त्यांच्या वतीने फटाके फोडून जल्लोष

खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांच्या मागण्या मान्य झाल्यामुळे उपोषण मागे घेताच सकल मराठा कार्यकर्त्यांच्या वतीने फटाके फोडून जल्लोष

येवला : पुढारी वृत्तसेवा

दिनांक 28 फेब्रुवारी सोमवार रोजी खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांच्या उपोषणाचा तिसऱ्या दिवशी सकल मराठा समाजाच्या वतीने राज्य सरकारला अल्टिमेटम देण्यात आला होता यात उपोषणकर्ते खासदार संभाजीराजे भोसले यांच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर रस्त्यावर उतरून तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल यावेळी राज्य सरकारने नमती भूमिका घेत खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांच्या सकल मराठा समाजाच्या बहुतांश मागण्या मान्य केल्या व हे उपोषण सोडण्यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे ,गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील आदींच्या शिष्टमंडळाने उपोषणस्थळी जाऊन लेखी आश्वासन दिल्याने खासदार संभाजीराजे यांचे उपोषण मागे घेण्यात आले उपोषण मागे घेत आज राज्यभरात सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला असून या पार्श्वभूमीवर येवला शहरातल्या विंचूर चौफुली मराठा समाजाच्या युवकांनी एकत्र येऊन फटाके फोडून एकमेकाला पेढे भरवत आनंदोत्सव साजरा केला या प्रसंगी सकल मराठा समाजाचे  शाहू शिंदे,आदित्य नाईक,निंबा फरताळे, अमोल पाबळे, तात्या पाटोळे, युवराज पाटोळे ,संजय सोमासे, यामा बापू,सागर नाईकवाडे, अरुण जाधव,प्रवीण जाधव,संदीप बर्शीले,रवींद्र बिडवे,गोरख कोटमे,प्रवीण जाधव,पिंटू मोरे, आदी  मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

थोडे नवीन जरा जुने