भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुक्तीभुमी स्मारक येवला येथे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृति शताब्दी दिनानिमित्त अभिवादन
येवला : वृत्तसेवा
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुक्तीभुमी स्मारक येवला येथे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृति शताब्दी दिनानिमित्त कृतज्ञता पर्व लोकराजाला वंदन करून दि.६ मे रोजी सकाळी १०:०० वा. १०० सेकंद स्तब्धता पाळून विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी मुक्तिभूमी स्मारकाच्या व्यवस्थापिका तथा संशोधन अधिकारी श्रीमती. पल्लवी पगारे यांच्याहस्ते राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेला पुष्प मालिका अर्पण करण्यात आली तर सुगंधी पुजा पर्यवेक्षक श्री सिद्धार्थ हिरे यांच्या हस्ते करण्यात आली यावेळी मुक्तीभूमी स्मारकाच्या व्यवस्थापिका यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या लोककल्याणकारी, न्यायी राजाच्या कार्याला उजाळा दिला. यावेळी पंचम साळवे विलास पगारे महेंद्र हिरे अशोक केदारे भाऊसाहेब पठारे समाधान गरुड अतिश पठारे आकाश अहिरे सागर साळवे नंदा साठे अनिता चंदनशिव आदी कर्मचारी उपस्थित होते.