राजे रघुजीबाबा यात्रा उत्सवास सुरुवात

राजे रघुजीबाबा यात्रा उत्सवास सुरुवात 

येवला - प्रतिनिधी

येवले शहराचे संस्थापक राजे रघुजीबाबा यात्रा उत्सवास सुरुवात झाली असून मंगळवारी सकाळी ९.३० च्या सुमारास भव्य पालखी व कावडींची सवाद्य मिरवणुक शहरातील पाटील गढी ते गंगादरवाजा येथुन काढण्यात आली. शहरातील विविधभागातुन ही मिरवणुक रघुजीबाबा मंदिरात पोहचली. यावेळी कावडीधारकांनी कोपरगाव येथुन गोदावरीच्या आणलेल्या गंगाजलाचा रघुजीबाबांना अभिषेक करण्यात आला. 

शहराचे संस्थापक असलेल्या रघुजीबाबा यांच्या  या यात्रोत्सवाला कावडी व पालखी मिरवणुकीने सुरुवात झाली. मंगळवारी सकाळी रघुजीबाबा यांच्या मुखवट्याची विधीपुर्वक  पुजा करुन  पालखीतुनमिरवणुक काढण्यात आली . पालखीमागे  कोपरगाव येथून  पायी आलेल्या कावडीधारकांचीही मिरवणुक काढण्यात आली होती. कावडीधारकांमध्ये शहर व तालुक्यातील  सहभाग दिसून येत होता. लहान मुले व युवकांचाउत्स्फुर्त  सहभाग कावडीधारकांमध्ये दिसून आला. तळपत्या उन्हामध्ये कावडी धारक अनवाणी कावड मिरवणुकीत सहभागी झाले होते. मिरवणुकीमध्ये  शाहूराजे शिंदे, जय बाबाजी भक्त परिवार चे सुनील शिंदे  प्रभाकर शिंदे, सुभाषबापू शिंदे,  विलास शिंदे,  प्रशांत शिंदे, नगरसेवक गणेश शिंदे, संजय शिंदे, अशोक शिंदे, अविनाश शिंदे, प्रवीण शिंदे, आबासाहेब शिंदे,    विजय शिंदे, संदिप शिंदे,  योगेश शिंदे, बबलू शिंदे , सनी शिंदे, भाऊसाहेब शिंदे, राष्ट्रीय काँग्रेसचे नानासाहेब शिंदे , सुबोध शिंदे,उमेश शिंदे , अक्षय तांदळे आदीसह येवला शहरवासीय भागी झाले होते.
थोडे नवीन जरा जुने