भाटगाव,धुळगाव येथे शाळा प्रवेशोत्सव साजरा....

भाटगाव,धुळगाव येथे शाळा प्रवेशोत्सव साजरा....

येवला : पुढारी वृत्तसेवा
 दिनांक 15 जून, शाळेचा पहिला दिवस यानिमित्ताने राज्यात सर्वत्र शाळा प्रवेशोत्सव तहसीलदार प्रमोद हिले,केंद्रप्रमुख रमेश खैरनार,वसंतराव पवार,प्रशासक कृषी उत्पन्न बाजार समिती येवला यांच्या उपस्थितीत अत्यंत आनंदात आणि उत्साहात साजरा केला गेला
. त्या निमित्ताने आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धुळगाव येथे या शाळा वर्ग पूर्वतयारी कार्यक्रम शिक्षणाच्या माध्यमातून स्पर्धेच्या काळात टिकणारा विद्यार्थी घडला पाहिजे आणि विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांच्या आवडीच्या क्षेत्रात त्यांना संधी उपलब्ध करून देतानाच विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा विषयक मार्गदर्शन दिले पाहिजे. आजच्या काळातील विद्यार्थी हा अत्यंत नवनिर्मितीक्षम आणि सतत नाविन्याचा शोध घेणारे आहेत त्यांच्या ज्ञानाची भूक भागवणे आणि त्यांना योग्य मार्गदर्शन करण्याकरिता शिक्षकांनी देखील स्वतःला अद्ययावत ठेवत आपली भूमिका आणि जबाबदारी कर्तव्यनिष्ठेने पूर्ण करणे आवश्यक आहे असे प्रतिपादन माननीय तहसीलदार यांनी केले. प्रसंगी इयत्ता पहिलीत दाखल झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प, चॉकलेट, पाठ्यपुस्तक आणि गणवेश देऊन स्वागत करण्यात आले. मुलांचे वजन व उंची, पायाचे ठस्से, बादलीत चेंडू टाकणे, चित्र रंगवणे, एकसारखेपणा ओळखणे, रंग ओळखणे, पानांचा आकार ओळखणे इत्यादी उपक्रम घेण्यात आले.इयत्ता पहिलीत नव्याने दाखल झालेल्या विद्यार्थ्यांसाठी शाळापूर्व तयारी वर्ग मेळावा आयोजित करण्यात आला होता त्यात त्यांच्या लावलेल्या स्टॉल  नुसार नाव नोंदणी कक्ष, शारीरिक विकास, बौद्धिक विकास, सामाजिक व भावनिक विकास ,भाषा विकास, गणन पूर्व  तयारी या सर्व स्टॉल नुसार प्रत्येक विद्यार्थ्याची पडताळणी करण्यात आली सर्व मुलांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे अचूकपणे दिली अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात धीटपणे मुले बोलत होती गणितीय भाषेत क्षमतांचे अवलोकन करण्यात आले. खुप छान असे मेळावा क्रमांक 2 चे नियोजन धुळगाव शाळेतील शिक्षकांनी केले होते.
तसेच मुख्य सेविका ठोंबरे मॅडम यांनी शाळा वर्ग पूर्वतयारी ला भेट देऊन मुलांचे स्वागत व कौतुक केले मुलांचा धीटपणा बघून त्या पण खूप कौतुक करायला लागल्या मुलांची गुणवत्ता त्यांना फार आवडली या कार्यक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक सय्यद सर, पोतदार सर, देवढे सर, दरेकर सर, उगले सर, शिरोळे मॅडम, निकुंभ मॅडम, वडाळकर मॅडम आणि विद्यार्थी उपस्थित होते..
थोडे नवीन जरा जुने