अवघ्या काही तासांत पकडले डिलिव्हरी बॉयला लुटनारे आरोपी येवला पोलिसांची कामगिरीअवघ्या काही तासांत पकडले डिलिव्हरी बॉयला लुटनारे आरोपी
येवला पोलिसांची कामगिरी

येवला : पुढारी वृत्तसेवा

येथे शनिवारी रात्री शहरात एका खासगी कंपनीच्या फुड डिलिव्हरीचे काम करणाऱ्या युवकाला 
दोन अज्ञात चोरट्यांनी रस्त्यात अडवून लूट करून त्याला बेदम मारहाण केली होती.या प्रकरणी शहर पोलिसांनी वेगाने तपासाची चक्रे फिरवत दोन दिवसातच बेड्या ठोकल्या आहेत.भर रस्त्यात बिनधास्तपणे हे वृत्त कृत्य करणाऱ्याना मुद्देमालासह पकडल्याने पोलिसांच्या या कारवाईचे नागरिकांकडून स्वागत होत आहे.
शहरातील मनोज वीरचंद शिंगी (वय ३८) हे शनिवारी रात्री दहा वाजता फूड कंपनीची ऑर्डर घेऊन कांदा मार्केट समोरील पाटोदा रस्त्यावर जात होते. यावेळी रस्त्याच्या कडेला गाडी थांबून ते आपल्या नातेवाईकांशी फोनवर बोलत असताना तेथे आलेल्या दोघा इसमांनी  शिंगी या फूड डिलिव्हरी बॉयला रस्त्यात अडवून लूट करून त्याला बेदम मारहाण केली आहे.यावेळी झालेल्या मारहाणीत मध्ये लुट झालेल्या तरुणाला ११ टाके पडले असल्याची माहिती मिळाली आहे.
त्याच्या ताब्यातील ६ हजार रुपये किमतीचा मोबाईल आणि ८ हजार २०० रुपये रोखे असे एकूण १४ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जबरदस्तीने काढून घेतला.यावेळी शिंगी यांनी त्यांना प्रतिकार केला असता त्यांच्या डोक्यावर काठीने वार करून त्यांना गंभीर जखमी केले यानंतर चोरटे पसार झाले.सिंगी यांच्या तक्रारीनुसार अज्ञात चोरट्यांनी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
हा गंभीर प्रकार असून शहरातील नागरिकांमध्ये दहशत निर्माण होऊ शकते.त्यामुळे जिल्हा पोलीस प्रमुख सचिन पाटील,उपअधीक्षक चंद्रकांत खांडवी,उपविभागीय पोलिस अधिकारी समीरसिंग साळवे,पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली वेगाने तपासाची चक्रे फिरवली व चोरट्यांपर्यत पोलिस पोहोचले.त्यानुसार गुन्हात वापरलेल्या वाहनासह आरोपी हा बस स्टैंड परिसरात फिरत असल्याची माहिती मिळाली.पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या सूचनेनुसार पोलिस निरीक्षक नितिन खंडागळे यांना आपल्या पथकासह बस स्टैण्ड परिसरात शोध घेतला.यावेळी गुन्हयात वपरलेली एक्टिवा (एम.एच. 15, ए.एच.1109) हिच्यासह ताब्यात घेतले.त्याने त्याचे नाव विकास मारुती कुराडे (वय २३,रा.संतोषी माता मंदिरा जवळ येवला) असे सांगितले.पोलिसांना त्याच्या जवळ  चोरीला गेलेला सिंग यांचा फोन तसेच रोख आठ हजार दोनशे रुपये मिळून आले आहे.तसेच त्याने गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल देखील पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.
तसेच त्याने त्याच्या साथीदाराचेही नाव सांगितले असून तो १६ वर्ष वयाचा अल्पवयीन आरोपी आहे.या दोघांना अटक करण्यात आली असून आज येवला न्यायालयात हजर केले असता त्यांना उद्या (ता.१४) पर्यत पोलिस कोठडी सुनावली आहे.दरम्यान चोरीच्या घटनासह चैन स्केचिंग होऊ नये यासाठी आम्ही पुरेपूर काळजी घेत आहोत. मात्र अशा घटना घडू नये यासाठी नागरिकांनी देखील काळजी घ्यावी.काही संशयित वावरतांना आढळल्यास तत्काळ आम्हाला माहिती कळवावी.नागरिकांच्या सहकार्याने असे गुन्हे वेळीच थांबवणे शक्य होईल असे आवाहन पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी केले आहे.
थोडे नवीन जरा जुने