संतोष विद्यालयाची सृष्टी जाधव येवला तालुक्यात प्रथम






संतोष विद्यालयाची सृष्टी जाधव येवला तालुक्यात प्रथम


येवला : 

बाभूळगाव येथील जगदंबा शिक्षण संस्थेच्या संतोष श्रमिक माध्यमिक विद्यालय व ज्यू. कॉलेजची विद्यार्थीनी सृष्टी जाधव ९३ टक्के गुण मिळवून विद्यालयासह तालुक्यात सर्वाधिक गुण मिळवून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे.
विद्यालयाचा निकाल १०० टक्के लागला.
विशेष म्हणजे विद्यालयातील ३८९ पैकी २९२ विद्यार्थी विशेष प्राविण्यासह प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहे.विज्ञान शाखेचा निकाल ९९.४१ टक्के लागला आहे.तालुक्यात सर्व शाखेतून प्रथम क्रमांक मिळवत सर्वाधिक गुण मिळवण्याचा मान मिळवत या कनिष्ठ महाविद्यालयाने उत्तुंग भरारी घेऊन नेत्रादिपक यश संपादन केले असल्याची माहिती प्राचार्य गोरख येवले यांनी दिली.
विज्ञान शाखेतील शाखेत सृष्टी जाधव ९३ टक्के गुण मिळवून येवला तालुक्यात प्रथम तर वैष्णवी क्षीरसागर ९२ टक्के मिळवून द्वितीय आली आहे.अनुराग पवार (91.67 टक्के) तृतीय तर पूर्वा शिंदे (91.50 टक्के),आकांक्षा पवार (91.33 टक्के),पूजा राजुडे (90.83 टक्के) यांनी नेत्रदीपक यश मिळवले.कला शाखेचा निकाल ९६ टक्के लागला असून चैताली मोरे (८० टक्के) प्रथम,घनश्याम बटवल (७८.५० टक्के) तृतीत क्रमांकाने उत्तीर्ण झाले.यशस्वी व गुणवंत विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष आमदार नरेंद्र दराडे,शिक्षक आमदार अध्यक्ष किशोर दराडे,संचालक लक्ष्मण दराडे,प्रशासकिय अधिकारी समाधान झाल्टे,समनवयक सुनील पवार आदींनी गौरव केला.प्राचार्य गोरख येवले,उपप्राचार्य आप्पासाहेब कदम,विभाग प्रमुख व्हि.आर.परदेशी,
किरण पैठणकर,दत्ता खोकले,मनोज खैरे,प्रदीप पाटील,भाऊसाहेब अनर्थे,
राहुल गोलाईत,अरुण जाधव,
रावसाहेब मोहन,विलास पिंगट,सुशील गायकवाड,किरण गायकवाड,नवनाथ जाधव,अजित देठे आदींचे विद्यार्थांना मार्गदर्शन लाभले.

"तालुक्‍यातील सर्वच विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक यश मिळविले आहे.आमच्या संतोष कनिष्ठ महाविद्यालयात वर्षभर विद्यार्थ्यांची सर्वतोपरी तयारी करून घेतली जाते.वेगवेगळ्या सराव परीक्षेचे आयोजन करून परीक्षेसाठी त्यांना सक्षम केले जाते.यामुळेच आमच्या विद्यालयाला तालुक्यात सर्व प्रथम क्रमांकाने येण्याचा मान मिळाला आहे.तालुक्यातील सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे मनापासून अभिनंदन!"
-किशोर दराडे,संस्थाध्यक्ष तथा शिक्षक आमदार

थोडे नवीन जरा जुने