बिजप्रक्रिया करुनच पेरणी करणार! शेतकरी बांधवांचा निर्धार.

हंगाम पुर्व शेतकरी चर्चा सत्रात कृषी विभागाच्या आवाहनाला शेतकरी बांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
 बिजप्रक्रिया करुनच पेरणी करणार! 
शेतकरी बांधवांचा निर्धार.


अंदरसुल ;दि.9;  शब्बीर इनामदार

येवला तालुक्यातील मौजे नांदेसर व आडगाव चोथवा, कोटमगाव खुर्द बु  येथे कृषी सहाय्यक सोनाली कदम यांनी परिसरातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन विविध ठिकाणी पेरणी पुर्वी बियाण्यास बीजप्रक्रिया कशी करावी याचे प्रात्यक्षिके करून दाखविली. आणि रोगविरहित पिकासाठी बिजप्रक्रिया किती महत्त्वाची आहे हे शेतकरी बांधवांना सांगितले त्याचप्रमाणे बीज प्रक्रियेत शेतकरी सहभाग वाढविण्यासाठी सहायक कृषी अधिकारी आणि आर सी एफ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या बिजप्रक्रिया स्पर्धा विषयी माहिती दिली. विविध ठिकाणी घेतलेल्या प्रात्यक्षिकांचे व्हिडिओ चित्रीकरण करुन परिसरातील इतर शेतकरी बांधवां पर्यंत पोहोचवले आणि आपण ही आपल्या बियाणे बीज प्रक्रियेचा छोटासा व्हिडिओ तयार करून पाठवा असे आवाहन केले. यामुळे शेतकरी बांधवांचा उत्साह वाढला आणि आम्ही ही बीज प्रक्रिया करुनच पेरणी करु आणि  बीज प्रक्रिया स्पर्धेत सहभागी होऊ अशी प्रतिज्ञा केली. खरीप हंगामाची पुर्व शेतकरी बांधवांना कृषी विभागाच्या वतीने विविध विषयांवर बांधावर जाऊन मार्गदर्शन केले जात आहे. हुमणी अळी नियंत्रण साठी प्रकाश सापळा कसा तयार करायचा याचे प्रात्यक्षिक, सोयाबीन उगवण क्षमता तपासणी प्रात्यक्षिक, बि.बि.एफ यंत्रणे पेरणी अशा विविध विषयांवर प्रात्यक्षिकासह चर्चा यावेळी करण्यात आली  यावेळी नांदेसर येथील सरपंच  सुभाष वाघ यांच्यासह परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बिजप्रक्रिया कशी करावी... 
बिजप्रक्रिया करणे हे अत्यंत महत्त्वाचे आणि तितकेच सोपे आहे असे सोनाली कदम यांनी सांगितले. बिजप्रक्रिया करताना शेतकरी बांधवांनी FIR हा क्रम लक्षात ठेवावा म्हणजे प्रथम बुरशीनाशक दुसरी किडनाशक तिसरी जिवाणू संवर्धक या क्रमाने बिजप्रक्रिया करावी. कृषी विभागाने शिफारस केलेल्या मात्रेमध्ये प्रत्येक पिकासाठी वरिल औषधांचे प्रमाण वापरावे. बिजप्रक्रिया करताना हातात मोजे किंवा पिशवी घालावी. आणि पेरणी करणार आहे त्याच दिवशी बिजप्रक्रिया करावी. बिजप्रक्रिया केलेले बियाणे पेरणी करुन शिल्लक राहिले तर असे बियाणे खाण्यासाठी किंवा जनावरांना चारा म्हणून वापर करू नये.
थोडे नवीन जरा जुने