पिंपळखुटे तिसरे येथे चोरटयांनी प्रसिद्ध म्हसोबा मंदिरात चोरट्यांनी दानपेटी फोडली

पिंपळखुटे तिसरे येथे चोरटयांनी
प्रसिद्ध म्हसोबा मंदिरात चोरट्यांनी दानपेटी फोडली 

येवला : पुढारी वृत्तसेवा
शनिवारी मध्यरात्री सुमारास येवला तालुक्यातील पिंपळखुटे तिसऱ्यातील प्रसिद्ध मसोबा मंदिरात चोरट्यांनी दानपेटी दूरवर नेऊन फोडली असून या दानपेटीतील अंदाजे रक्कम 1 लाख 5 हजार इतकी रक्कम चोरट्यांनी चोरून नेली आहे सोबत चोरट्यांनी मंदिराचा सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा डीव्हीआर देखील पळून नेला आहे
अधिक माहिती अशीकी
रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी पिंपळखुटे येथील विद्युत पुरवठा खंडित करून प्रसिद्ध असलेल्या म्हसोबा मंदिरातील दानपेटीवर झालेला मारला आहे सोबतच मंदिरात ठेवलेला सीसीटीव्हीआर देखील पळून नेला आहे गेल्या वर्षी देखील मंदिरातील दानपेटी फोडण्याची घटना घडली होती या पार्श्वभूमीवर या ठिकाणी सीसीटीव्ही बसवण्यात आला होता मात्र चोरट्यांनी यावेळेस चोरीची नवी पद्धत अवलंबली आहे या घटनेची माहिती पोलिसांना समजतात घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत खांडवी, मनमाड पोलीस उपाधीक्षक समीरसिंह साळवे, तालुका पोलीस निरीक्षक अनिल भवारी, सहाय्यक निरीक्षक एकनाथ भिसे, पोलीस हवालदार माधव सानप, पोलीस शिपाई आबा पिसाळ सतीश मोरे, आधी सह स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस नाईक विश्वनाथ काकड यांनी देखील घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे येवला तालुका पोलिसात या घटनेची नोंद करण्यात आली असून याकडे पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक एकनाथ भिसे करत आहेत
थोडे नवीन जरा जुने