येवल्यातील विठ्ठल मंदिरात सोमवारपर्यत सप्ताह,ज्ञानेश्वरी पारायण, किर्तन सोहळा

येवल्यातील विठ्ठल मंदिरात सोमवारपर्यत सप्ताह,ज्ञानेश्वरी पारायण, किर्तन सोहळा

येवला : पुढारी वृत्तसेवा

येथील विठ्ठल मंदिरात अखंड हरिनाम सप्ताह तसेच श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व किर्तन सोहळा आजपासून सुरू झाला.माजी नगरसेवक गणेश शिंदे यांच्या हस्ते कलश पूजा करून या सप्ताहाचा प्रारंभ झाला. 
आषाढी एकादशीनिमित्त आजपासून सोमवार (ता.११) पर्यंत हा सप्ताह चालणार आहे. आज सकाळी विठ्ठल मंदिरात माजी नगरसेवक गणेश शिंदे यांच्या हस्ते सहपत्नी कलश पूजन व विठ्ठलाची पूजा करून सप्ताहाचा प्रारंभ झाला. 
मंदिरात सप्ताह काळात दररोज पहाटे काकड आरती, सकाळी ८ ते १२ वाजेपर्यंत ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण,दुपारी तीन ते पाच वाजेपर्यंत महिला मंडळाचे भजन, सायंकाळी पाच ते सहा वाजेपर्यंत प्रवचन,तर सहा ते सात वाजेपर्यंत हरिपाठ आणि रात्री ९ ते ११ वाजेपर्यंत कीर्तन अशा भरगच्च धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.सौ.निर्मला करमासे व्यासपीठ चालक आहेत.
या काळात सत्यनारायण त्रिपाठी, रामेश्वरशास्त्री मिश्रा,डॉ.निलेश आहेर, समाजसेवक प्रभाकर झळके,अविनाश पाटील,डॉ. प्रसाद कुलकर्णी यांचे रोज प्रवचने होणार आहेत तर श्याममहाराज ठोंबरे,जालिंदरमहाराज शिंदे,हेमलताताई पिंगळे,रामायणाचार्य ज्ञानेश्वर महाराज शिंदे,सुवर्णाताई जमदाडे,निवृत्तीमहाराज चव्हाण,देविदासमहाराज धनेरकर यांचे रात्री नऊ ते अकरावाजे दरम्यान कीर्तन होणार आहे.
पुढील सोमवारी गोरख महाराज काळे यांचे काल्याचे किर्तन व महाप्रसाद होऊन सप्ताहाचा समारोप होईल तर रविवारी दुपारी दोन वाजता श्रींची पालखी व रथयात्रा मिरवणूक आयोजित करण्यात आली आहे.विठ्ठल मंदिर संस्थानचे विश्वस्त दिलीप पाटील,अनंत संत,श्रीकांत महाभागवत यांच्यासह भाविकांनी सप्ताहाचे संयोजन केले आहे.या काळात शहरातील दानशूर भाविकांनी रोज अल्पपहार व भोजनाचे दान देखील केले असून येवलेकरांनी या भक्तिमय सोहळ्यात सहभागी होण्याचे आवाहन संस्थानने केले आहे.
थोडे नवीन जरा जुने