गद्दार आमदारांना थोडी जरी लाज शिल्लक असेल तर आमदारकीचा राजीनामा देऊन निवडणूक लढवून दाखवागद्दार आमदारांना थोडी जरी लाज शिल्लक असेल तर आमदारकीचा राजीनामा देऊन निवडणूक लढवून दाखवा

शिवसंवाद यात्रे दरम्यान आदित्य ठाकरेंचा येवल्यात हल्लाबोल 

येवला पुढारी। वृत्तसेवा
शिवसेना नेते युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे शिवसंवाद दौऱ्यावर असून त्यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसंवाद यात्रेचे येवला येथील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात शिवसैनिकांच्या वतीने मोठया उत्साहात ढोल ताशांच्या गजरात फटाक्यांची आतिषबाजी करत भव्य स्वागत करण्यात आले पक्षाशी गद्दारी करून शिवसेनेतून फुटून गेलेल्या आमदारांवर आदित्य ठाकरे यांनी घनाघात करताना फुटीर आमदारांनी माणुसकीशी गद्दारी केली आहे ते पण उद्धवसाहेब आजारी असतांना हे सर्व पळाले त्यांनी थोडी तरी लाज ठेवायला पाहिजे होती ती सुद्धा ठेवली नाही. थोडी जरी लाज शिल्लक असेल तर आमदारकीचा राजीनामा देऊन शिवसेना या चार अक्षरी शब्दांशिवाय निवडून येऊन दाखवाच असे आव्हान त्यांनी बंडखोर आमदारांना दिले शिवसैनिकांची ताकद ही शिवसेनेच्या पाठीशी असल्याने सर्वसामान्य शिवसैनिकांच्या जोरावर शिवसेना ही पुन्हा एकदा उचल खाल्ल्याशिवाय राहणार नाही असेही आदित्य ठाकरे यांनी सांगितले  शिवसेना मध्यवर्ती कार्यालय येथे शिवसेना संपर्कप्रमुख जयंत दिंडे आमदार नरेंद्र दराडे जिल्हाप्रमुख कुणाल दराडे सह संपर्कप्रमुख संभाजी पवार उपजिल्हाप्रमुख भास्कर कोंढरे तालुकाप्रमुख रतन बोरणारे शहर प्रमुख राजेंद्र लोणारी किशोर सोनवणे भागीनाथ थोरात वाल्मीक गोरे लासलगावचे प्रकाश पाटील निवृत्ती जगताप महिला आघाडी जिल्हाप्रमुख भारतीताई जाधव झुंजार देशमुख ,चंद्रमोहन मोरे शहर संघटक राहुल लोणारी, आशिष अनकाईकर झामभाऊ जावळे ,दीपक भदाणे चंद्रकांत शिंदे विठ्ठल महाले सुभाष शिरसाठ छगन आहेर रफीक शेख मकरंद तक्ते विजय गोसावी मोफीज अत्तार यांच्यासह हजारो कार्यकर्ते उपस्थित होते
थोडे नवीन जरा जुने