देखाव्या मधून समाजप्रबोधनाची आरास मांडा ... बी जी शेखर

देखाव्या मधून समाजप्रबोधनाची आरास मांडा ... बी जी शेखर


येवला : पुढारी वृत्तसेवा

लवकरच येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नाशिक पोलीस परिषदचे पोलीस उप महानिरीक्षक श्री बीजी शेखर पाटील यांनी येवला शहरात गणेश उत्सव पदाधिकारी आणि सामाजिक कार्यकर्त्यांची बैठक घेत गणेश उत्सव शांततेत पारंपारिक पद्धतीने पार पाडावा असे आव्हान केले

कायदेशीर तत्त्वांचे पालन करून गणेश उत्सव साजरा करावा आपल्या शहराला नावलौकिकाला साजेसे सण साजरे करावे कुठलेही गालबोट शहराला लावू नये असे आवाहनही त्यांनी यावेळेस केले जे काही देखावे असतील जे काही आरास असतील त्याचा उपयोग  समाजाला व्हावा सामाजिक प्रबोधन होईल असा उद्देश ठेवून समाजाला त्यातून काही घेता येईल असे  चांगले उपक्रम यामध्ये ठेवावे असे आवाहनही त्यांनी केले. 
यावेळी मालेगावचे अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत खांडवी, पोलीस उपअधीक्षक समरसिंह साळवे,पोलीस निरीक्षक भगवान मथुरे, येवला तालुका ग्रामीण पोलीस निरीक्षक अनिल भवारी, सामाजिक कार्यकर्ते  अजीज शेख, शहर काजी सलीम, मानाच्या प्रथम गणपतीचे प्रमुख व माजी नगराध्यक्ष भोलानाथ लोणारी,आलमगीर शेख, दादाभाई फिटर,  भाजपचे जिल्हा सरचिटणीस आनंद शिंदे, शिवसेना शहर प्रमुख राजेंद्र लोणारी, शिवसेना शहर संघटक राहुल लोणारी, शांतता कमिटी सदस्य भूषण शिनकर, प्रहार शेतकरी संघटनेचे तालुका उपाध्यक्ष  रामभाऊ नाईकवाडे,  प्रहार संघटनेचे तालुका युवा उपाध्यक्ष सुनील पाचपुते, वंचित बहुजन आघाडीचे संजय पगारे, मुख्तार तांबोळी, किशोर सोनवणे
आदि उपस्थित होते
थोडे नवीन जरा जुने