समग्र शिक्षा अभियानातून १५ विद्यार्थ्यांच्या डोळ्यांच्या तर तिघांवर फाटलेली टाळूची शस्रक्रिया

समग्र शिक्षा अभियानातून १५ विद्यार्थ्यांच्या डोळ्यांच्या तर तिघांवर फाटलेली टाळूची शस्रक्रिया


येवला :  पुढारी वृत्तसेवा
 शिक्षण विभागाच्या  पुढाकाराने तालुक्यातील ९७ विद्यार्थ्यांच्या डोळ्यांची तपासणी झाली असून यातील १५ जनावर मोफत शस्रक्रिया केली जाणार आहे.तसेच तिघांवर फाटलेले ओठ व टाळूची शस्रक्रिया देखील होणार आहे.
वेदांत हॉस्पिटल नाशिक व पंचायत समिती समग्र शिक्षा अभियान यांच्या संयुक्त विद्यमानाने तालुकास्तरीय दुभंगलेले ओठ व फाटलेली टाळू शस्त्रक्रिया पूर्व तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या शिबिरासाठी वेदांत हॉस्पिटल मधील डॉक्टर उपस्थित होते.या ठिकाणी तालुक्यातील झिरो ते अठरा वर्षाच्या वयातील संदर्भित झालेल्या विद्यार्थ्यांची शस्त्रक्रिया पूर्व तपासणीसाठी तपासणी करण्यात आली.
दीड ते दोन लाखापर्यंत मोफत शस्त्रक्रिया करण्यात आले.यात साईनाथ शिवराम पवार (जि.प.शाळा,वाघाळे),मिसबा अशपाक मन्सुरी (जि.प.शाळा उर्दू येवला),शिवप्रसाद शिवराम आरखडे (जि.प. शाळा तळवाडे) यांची निवड झाली आहे. तपासणीसाठी सात विद्यार्थ्यांपैकी तीन विद्यार्थी शस्त्रक्रियेसाठी जिल्हास्तरावर संदर्भीत झालेले आहेत.यावेळी विद्यार्थ्यांच्या पालकांना डॉक्टर व इतर सर्व अधिकारी कर्मचारी आणि सविस्तर मार्गदर्शन केले. गटविकास अधिकारी अन्सार शेख, गटशिक्षणाधिकारी अधिकारी प्रशांत गायकवाड,समग्र शिक्षा अभियानाचे गट समन्वयक सुनील मारवाडी यांनी मार्गदर्शन केले.समावेशित शिक्षण विशेषतज्ञ हनुमंत लांडगे,विशेष शिक्षक प्रवीण मांडळकर,पुंडलिक गवांदे,संदीप महाले,चारुशीला तरवडे,शैला भवर हे उपस्थित होते.
तसेच आज नेत्र तपासणी मोफत शस्त्रक्रिया शिबिर येथील उपजिल्हा रुग्णालय येथे सुयोग हॉस्पिटल नाशिक, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम व समावेशित शिक्षण यांच्या संयुक्त विद्यमानाने शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या शिबिरासाठी शाळेतील संदर्भित झालेले ० ते १८ वर्षे वयोगटातील दृष्टीदोष विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली.तालुक्यातून एकूण ९७ विद्यार्थी उपस्थित होते.या सर्व विद्यार्थ्यांची नेत्र तपासणी करण्यात आली असून ५१ विद्यार्थी चष्मेसाठी रेफर झाले.सदर विद्यार्थ्यांना मोफत चष्म्याचे वाटप केले जाणार आहे.तर १५ विद्यार्थी शस्त्रक्रियेसाठी सुयोग हॉस्पिटल नाशिक येथे संदर्भित झाले आहेत.त्यांना येवला ते नाशिक ये जा करण्याची सोय ही मोफत केली जाणार आहे.शस्त्रक्रियाही मोफत केल्या जाणार आहेत.या शिबिरासाठी सुयोग हॉस्पिटल नाशिक येथील तज्ञ डॉ. मिथुन नगराळे व त्यांची टीम,उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक शैलजा कुपास्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. राकेश गावित,डॉ.सीमा सोनवणे,डॉ. स्वाती शेळके,डॉ.शोभा वाघ,आफ्रीन खान,रामेश्वरी कडतन व निशा कांबळे यांनी तपासणीसाठी सहकार्य केले.
समावेश शिक्षणचे विशेषतज्ञ योगेश लांडगे व हनुमंत लांडगे,विशेष शिक्षक चारुशीला तरवडे,शैला भवर,पुंडलिक गवांदे,प्रवीण मांडळकर,संदीप महाले आदी उपस्थित होते.

येवला : समग्र शिक्षा अभियानात मोफत शस्रक्रियेसाठी येथील उपजिल्हा रुग्णालयात विद्यार्थी तपासणीप्रसंगी वैद्यकीय अधिकारी.उपस्थित विस्तार अधिकारी सुनील मारवाडी,विशेषतज्ञ हनुमंत लांडगे आदी
थोडे नवीन जरा जुने