येवला उपजिल्हा रुग्णालयातील कंत्राटी कामगारांचे कामबंद आंदोलन माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी घेतली दखल प्रश्न मार्गी

येवला उपजिल्हा रुग्णालयातील कंत्राटी कामगारांचे कामबंद आंदोलन

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी घेतली दखल

प्रश्न मार्गी

येवला : पुढारी वृत्तसेवा
उपजिल्हा रुग्णालयातील कंत्राटी कामगारांनी आपल्या थकीत वेतनासाठी काळ्या फिती लावून काम बंद आंदोलन केले या आंदोलनाची माहिती मिळताच माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी याप्रश्नी जातीने लक्ष घालत येत्या आठ दिवसांत सर्व कर्मचाऱ्यांचे पगार करण्याचे आदेश संबधीत ठेकेदाराला दिले याप्रश्नी ठोस आश्वासन मिळाल्याने कर्मचारी पुन्हा कामावर रुजू झाल्याने रुग्णालयातील कामकाज सुरळीत झाले
याबाबत अधिक माहिती अशी की उपजिल्हा रुग्णालय येवला येथील कंत्राटी कामगारांनी आपल्या थकीत वेतनासाठी काम बंद आंदोलन सुरू केले
नाशिकस्थित महाराष्ट्र विकास ग्रुप या खाजगी कंपनीतर्फे उपजिल्हा रुग्णालय येथे जुलै २०२१ मध्ये ४८ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती त्यानंतर जून २०२२ ते ऑगस्ट २०२२ या तीन महिन्यांचे वेतन या कामगारांना मिळाले नसल्याने त्यांची उपासमार सुरू होती  सदर कर्मचाऱ्यांच्या कंत्राटी नियुक्तीचा कालावधी देखील संपलेला असून केवळ तोंडी आश्वासनावर कर्मचारी काम करत आहेत कंत्राटी कामगार म्हणून नियुक्ती करून मिळावी तसेच जून ते ऑगस्ट २०२२ असे तीन महिन्याचे थकीत वेतन मिळावे या मागणीसाठी आज या  कामगारांनी काम बंद आंदोलन सुरू केले आंदोलनाची माहिती मिळताच माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या संपर्क कार्यालय प्रमुख बाळासाहेब लोखंडे व राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष दीपक लोणारी यांनी धाव घेत कर्मचाऱ्यांशी चर्चा करून प्रश्न निकाली काढला पुढील आठ दिवसात या कर्मचाऱ्यांच्या पगारासह इतर मागण्या पूर्ण करण्यात याव्यात असे आदेश संबधीतांना दिले त्यामुळे या कर्मचाऱ्यांचा प्रश्न सुटला असून कर्मचारी कामावर हजर झाले आहेत रुग्णसेवेत कोणताही व्यत्यय आला नसून कामकाज सुरळीत सूरु असल्याची माहिती उपजिल्हा रुग्णालयाच्या वतीने देण्यात आली आहे
थोडे नवीन जरा जुने