श्रीलंकेच्या भारतातील राजदूतांना येवल्याच्या पैठणीची भुरळ

श्रीलंकेच्या भारतातील राजदूतांना येवल्याच्या पैठणीची भुरळ 
येवला : पुढारी वृत्तसेवा
 शेजारील राष्ट्र असलेल्या श्रीलंका देशाचे भारतातील राजदूत वालसन वेतहोडी यांना येवल्याच्या पैठणीने भुरळ घातली असून शिर्डी येथे दर्शनासाठी आल्यानंतर पैठणी विषयी विशेष आकर्षण असल्याने त्यांनी आपल्या अधिकाऱ्यांना अचानक येवला येथे पैठणी उत्पादन ठिकाणी भेट देण्याचा आग्रह धरला.  येवला दौऱ्यावर आल्यानंतर
श्रीलंकेचे राजदूत वालसन वेतहोडी व त्यांच्या पत्नी अनिता वेतहोडी यांनी येवल्यातील प्रसिद्ध कापसे पैठणी यांच्या वडगाव येथील कारखान्यास भेट दिली.
या ठिकाणी मूकबधिर मुलांच्या हाताने पैठणी विणकाम पाहून श्रीलंकेचे पाहुणे भारावून गेले होते. या प्रसंगी
त्यांना पैठणी खरेदीचा मोह देखील आवरता आला नाही.
या प्रसंगी पत्रकारांनी त्यांच्या भेटीचा हेतू विचारल्यानंतर श्रीलंकाही भारताच्या दक्षिण बाजूला असून , भारतीय संस्कृती विषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे . यापूर्वी आपण बनारसी सिल्क आणि कांजीपुरम सिल्क असे साड्यांचे प्रकार ऐकले होते. मात्र मुंबई येथे श्रीलंकेच्या दुतावासामध्ये पोस्टिंग झाल्यानंतर मुंबईमध्ये पैठणी पैठणी हा शब्द सारखा कानावर येऊ लागला. त्यामुळे पैठणी विषयी मला विशेष आकर्षण वाटले म्हणून शिर्डी दौऱ्यावर आल्यानंतर आम्ही सर्वप्रथम पैठणी प्रसिद्ध येवलेला भेट देण्याचा ठरवलं.  येथे आल्यानंतर कापसे पैठणी उद्योग समूहाच्या वतीने स्वागत करण्यात आले त्याबद्दल त्यांनी त्यांचे आभार व्यक्त केले. या ठिकाणी ज्या दिव्यांग मुलांच्या हाताने ही पैठणी साडी तयार झाली असून त्यांच्या विणकामाचा त्यांनी कौतुक केले. 
कापसे उद्योग समूहाने दिव्यांग मुलांना पैठणी विणण्याचे प्रशिक्षण देऊन त्यांच्या पायावर त्यांना उभं केलं आहे याबद्दल त्यांनी समाधन व्यक्त केले.

या दौऱ्या दरम्यान श्रीलंकेच्या व्हिसा अधिकारी सुमिथरा मेगास मुला, कापसे पैठणी उद्योग समूहाचे दिलीप खोकले,सुनीता खोकले, तसेच श्रीलंकन दूतावासातील उच्चपदस्थ अधिकारी, येवला शहर पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी उपस्थित होते.
थोडे नवीन जरा जुने