श्री क्षेत्र कोटमगाव येथे घटस्थापनेने नवरात्र यात्रा उत्सवाला सुरुवात

श्री क्षेत्र कोटमगाव येथे घटस्थापनेने नवरात्र यात्रा उत्सवाला सुरुवात 

येवला : पुढारी वृत्तसेवा

महालक्ष्मी महाकाली महासरस्वती या साडेतीन शक्तीपीठाचा दर्जा असलेल्या  येवला तालुक्यातील श्रीक्षेत्र कोटमगाव या ठिकाणी  नवरात्र उत्सवास मोठ्या उत्साहात सुरुवात झाली . राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन महाराजांचे शिष्य परमपूज्य सद्गुरु रमेश गिरी महाराज यांच्या शुभ हस्ते घटाचे पूजन करून देवीच्या आरतीने नवरात्र उत्सवाची सुरुवात करण्यात आली.
याप्रसंगी संस्थानचे अध्यक्ष रावसाहेब कोटमे, विश्वस्त रामचंद्र लहरे, भाऊसाहेब आदमाने, व्यवस्थापक राजेंद्र कोटमे, विजय लहरे, दिलीप कोटमे, भगवान कोटमे ,दीपक कोटमे ,शरद लहरे ,कृष्ण कोटमे सुभाष कोटमे आदी ग्रामस्थ विश्वस्त यांचेसह भुजबळांच्या सम्पर्क कार्यालय प्रमुख बाळासाहेब लोखंडे व मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.
कोरोना कालखंडानंतर प्रथमच मोठ्या उत्साहात यात्रा उत्सव संपन्न होत असून कोटमगाव देवस्थान ट्रस्टच्या वतीने भाविकांसाठी चोख व्यवस्था ठेवण्यात आली आहे . यावर्षी प्रथमच तीन हजार भाविक घटी बसले असून प्रत्येक घटी बसणाऱ्या भाविकांचे ट्रस्ट तर्फे रजिस्ट्रेशन केले जात आहे, आरोग्याच्या दृष्टीने तालुका आरोग्य विभागाच्या वतीने आरोग्य कॅम्प ठेवण्यात येणार असून कुणाल दराडे फाउंडेशन च्या वतीने देखील आरोग्य कॅम्प चे आयोजन केले जाणार आहे.
शहर पोलिसांच्या वतीने यात्रा कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. 
भाविकांनी मोठ्या प्रमाणावर दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन रस्त्याचे अध्यक्ष रावसाहेब कोटमे यांनी केला आहे.
थोडे नवीन जरा जुने