येवला तालुका केमिस्ट असोसिएशनच्या चुरशीच्या निवडणुकीत अरुण काळे यांचा विजय

येवला तालुका केमिस्ट असोसिएशनच्या चुरशीच्या निवडणुकीत अरुण काळे यांचा विजय

येवला : पुढारी वृत्तसेवा

दिनांक 16 ऑक्टोबर रविवार रोजी येवला तालुका केमिस्ट असोसिएशन यांच्या वतीने जिल्हा प्रतिनिधी पदासाठी लोकशाही पद्धतीने निवडणूक घेण्यात आली
सदरची निवडणूक मातब्बर नेत्यांनी हात घातल्यामुळे अत्यंत प्रतिष्ठेची झाली होती
अवघ्या 228 सभासद असलेल्या येवला तालुका मेडिकल असोसिएशनच्या निवडणुकीचा निकाल मतदान झाल्यानंतर काही तासाच्या आत जाहीर करण्यात आला
228 पैकी 203 सभासदांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला यामध्ये विजयी उमेदवार अरुण रायभान काळे यांना 102 मत आणि पराभूत उमेदवार रवी पवार यांना 99 मत पडली तर दोन मते बाद झाली
दरम्यान यावर्षीची ही त्रैवार्षिक निवडणूक विशेष लक्षवेधी ठरली या निवडणुकीमध्ये राजकीय नेत्यांनी देखील उडी घेतल्यामुळे निवडणुकीची चुरस आणखीच वाढली होती
गेल्या बारा वर्षापासून रवी पवार हे संघटनेचे पदाधिकारी होते अरुण काळे यांच्या रूपाने परिवर्तन झाले असून 
अरुण काळे विजय घोषित होताच त्यांच्या समर्थकांनी एकच जल्लोष करत फटाक्यांची अतिशबाजी  करून आनंद उत्सव साजरा केला
दरम्यान विजयी उमेदवार अरुण काळे यांनी आपल्या विजयाचे श्रेय सर्व मेडिकल असोसिएशनला दिले असून यापुढे मेडिकल दुकानदारांच्या प्रश्नासाठी प्रयत्नशील राहणार असून सर्व मतदारांचे आभार मानले
थोडे नवीन जरा जुने