येवल्यातील श्रीकाळभैरवनाथ मंदिर येथे जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा
येवला : पुढारी वृत्तसेवा
येवले शहरातील ग्रामदैवत असलेले श्रीकालभैरवनाथ व जोगेश्वरी माता मंदिर येथे आज जयंती उत्सव साजरा करण्यात आला. सकाळी 6 वाजेला मूर्तीला अभिषेक करण्यात आला.तसेच सत्यनारायण पुजा व त्यानंतर सालाबादप्रमाणे येवले शहरातून पारंपरिक पद्धतीने सवाद्य पालखीमिरवणूक काढण्यात आली.दुपारी महाआरती व महाप्रसाद आयोजित करण्यात आले.सदर प्रसंगी येवल्याचे आमदार मा. ना. छगन भुजबळ साहेब यांचे स्विय सहाय्यक बाळासाहेब लोखंडे उपस्थित त्यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. त्यांनी या पुरातन मंदिराच्या सभामंडपासाठी मोठ्या प्रमाणात निधी जाहीर केला. राऊळ समाजाच्या वतीने बाळासाहेब लोखंडे व इतर उपस्थित मान्यवरांचा शाल, श्रीफळ देऊन यथोचित सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष राऊळ सर यांनी केले तर मंदिराचे पुजारी बाळनाथ राऊळ व नवनाथ राऊळ यांनी मंदिराचा इतिहास व धार्मिक महत्व यावेळी विषद केले. शरद राऊळ यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले. सदर प्रसंगी राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टीचे अध्यक्ष वसंत पवार,शहराध्यक्ष दिपक लोणारी, गोटू मांजरे, सुमित थोरात, सचिन सोनवणे, गणेश गवळी, संदीप बोदरे, संतोष राऊळ यांसह महाराष्ट्रातील विविध ठिकाणांहून आलेले राऊळ बांधव, येवल्यातील समस्त राऊळ समाज बांधव, श्रीकाळभैरवनाथ संस्थानचे सर्व विश्वस्थ व येवले शहरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.