कोळगाव येथे साठवणूक केलेल्या मका बीटयांना आग 5 एकरच्या बिट्ट्याची झाली राख

कोळगाव येथे साठवणूक केलेल्या मका बीटयांना आग 

 5 एकरच्या बिट्ट्याची झाली राख

येवला : प्रतिनिधी

तालुक्यातील कोळगाव या ठिकाणी माजी सैनिक असलेले शेतकरी संदीप केशव धनवटे यांच्या पाच एकर मका क्षेत्रातील काढणी करून साठवून ठेवलेल्या होते.  गुरुवारी दुपारच्या सुमारास या बीट्यांना अचानक आग लागली. यानंतर परिसरातील शेतकऱ्यांनी आणि ग्रामस्थांनी येवला अग्निशमन दलाला पाचारण देखील केले होते. मात्र यापूर्वीच परिसरातील नागरिकांनी एकत्र येऊन मिळेल त्या मदतीच्या सहाय्याने आग विझवण्याचा प्रयत्न केला . 
संदीप धनवटे हे माजी सैनिक असून देश सेवा करून सध्या ते शेती करण्यासाठी आपल्या गावी आले होते . पिडीत शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी होत असून तहसीलदार प्रमोद हिले यांनी तातडीने संबंधित तलाठी यांना घटनेचा पंचनामा करण्याच्या सूचना दिल्या आहेत . याप्रसंगी
कोळगाव चे सरपंच संदीप गायकवाड,हिरालाल सानप,गोरख माळी,धोंडीराम गायकवाड,विलास गाडे,योगेश धनवटे,रमेश शिंदे, बाबुराव धनवटे,गोकुळ गाडे,दिलीप गिडघे आदी शेतकरी आग विझवण्यासाठी उपस्थित होते
थोडे नवीन जरा जुने