बनकर पाटील पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांची तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत चमकदार कामगिरी...

बनकर पाटील पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांची तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत चमकदार कामगिरी...

अॅथेलॅटिक्स, बुद्धिबळ , कराटे , सांघिक प्रकारात विद्यार्थ्यांची जिल्हास्तरावर निवड..

जलतरण, सायकलींग मध्ये विद्यार्थ्यांची विभागीय स्तरावर निवड..

येवला  : पुढारी वृत्तसेवा
 तालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये बनकर पाटील पब्लिक स्कूल च्या विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक कामगिरी करत घवघवीत यश संपादन केले असून अनेक विद्यार्थ्यांची वैयक्तिक तसेच सांघिक प्रकारात जिल्हा व विभागीय स्तर स्पर्धांसाठी निवड झाली.

 येथे क्रीडा व युवक संचालनालय, महाराष्ट्र राज्य पूणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी व जिल्हा परिषद नाशिक, आयोजित   तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धांमध्ये विविध खेळांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धा संपूर्ण तालुक्यातील १४,१७ व १९ वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या होत्या.

याअंतर्गत आयोजित सांघिक क्रीडा प्रकारातील १९ वर्षे वयोगटातील मुलांच्या क्रिकेट स्पर्धेत बनकर पाटील पब्लिक स्कूल च्या विद्यार्थ्यांनी चुरशीच्या अंतिम सामन्यात विजेतेपद पटकावत जिल्हास्तर स्पर्धेसाठी पात्रता मिळवली. कराटे स्पर्धा येवला तालुका क्रिडा संकूल येथे पार पडल्या. तालुक्यातील शंभरावर विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. यामध्ये १४,१७ व १९ वर्षे वयोगटात सहभाग नोंदवत उत्कृष्ट कामगिरी करत प्रथम क्रमांक मिळवून जिल्हास्तरावरील स्पर्धेसाठी पात्रता मिळवली. यामध्ये चौदा वर्षा आतील मुली या वयोगटात कुमारी अंशूनी सागर चव्हाण व  कुमारी आदिती ज्ञानेश्वर पायमोडे यांनी प्रथम क्रमांक मिळवला, तर सह्याद्री अस्वले, कल्याणी निकम आणि तृप्ती कायस्थ यांनी द्वितीय  क्रमांक मिळवला.तसेच  मुलांच्या गटात कु. आरव धर्मराज अलगट याने प्रथम क्रमांक मिळवला. तर एकोणविस वर्षा आतील वयोगटात कुमार ईश्वर अष्टेकर याने प्रथम क्रमांक मिळवला.

      तसेच मुलींच्या कबड्डीमध्ये चौदा,सतरा आणि एकोणविस वर्षा आतील मुलींच्या संघाने तिन्ही गटात उपविजेतेपद पटकावत मुलींच्या गटात आपला दबदबा निर्माण केला. तर जनता विद्यालयाच्या प्रांगणावर झालेल्या मैदानी स्पर्धेत चौदा वर्षा आतील मुली या वयोगटात स्पर्धेत शंभर  व दोनशे मीटर धावणे या क्रीडा प्रकारात वैष्णवी अनिल कदम हिने अनुक्रमे प्रथम व द्वितीय क्रमांक मिळवला. तर गोळा फेक आणि थाळीफेक या वैयक्तिक क्रीडा प्रकारात कार्तिकी संजय बनकर हिने प्रथम क्रमांक मिळवला. यासह ऋतुजा नवनाथ खोडके व राजेश्वरी नितीन बनकर यांनी गोळा फेक आणि थाळीफेक या क्रीडा प्रकारात अनुक्रमे द्वितीय क्रमांक मिळवला. तसेच ४x१०० रिले यामध्येही आपला दबदबा कायम ठेवत वैष्णवी कदम, समीक्षा बनसोडे ,तनुजा खोडके, ऋतुजा आसळकर आणि सृष्टी कमोदकर या मुलींनी पहिला क्रमांक पटकावला तर मुलांच्या गटात चारशे मीटर धावणे यामध्ये पार्थ भाऊसाहेब झांबरे यांनी द्वितीय क्रमांक पटकावला. ४x१०० रिले मीटर रिले यामध्ये पार्थ झांबरे, आरव अलगट, सुजल कदम ,अभिनव बोरसे आणि आयुष पाचंगे या विद्यार्थ्यांनी तृतीय क्रमांक मिळवला. सतरा वर्षातील मुले दोनशे मीटर धावणे या क्रीडा प्रकारात अथर्व अण्णासाहेब बनकर यांनी द्वितीय क्रमांक आणि ४x१०० मीटर रिले यामध्ये मुलांच्या संघाने द्वितीय क्रमांक मिळवला. तसेच एकोणविस वर्षातील मुलांमध्ये पंधराशे मीटर धावणे यात शुभम प्रकाश बोराडे याने द्वितीय,थाळीफेक मध्ये स्वराज संदेश शिंदे यांनी तृतीय आणि शंभर मीटर धावणे मुली यात साक्षी रवींद्र चव्हाण हिने तृतीय क्रमांक मिळवत मैदानी स्पर्धेमध्ये चमकदार कामगिरी केली. तसेच चौदा वर्षातील बुद्धिबळ स्पर्धेमध्ये आपले वर्चस्व कायम ठेवत तालुक्यातून तब्बल 50 विद्यार्थ्यांच्या सहभागामध्ये शाळेच्या प्रणव किरण आहेर याने द्वितीय , पार्थ प्रवीण बनकर यांनी तृतीय क्रमांक तर मुलींमध्ये अदिती ज्ञानेश्वर पायमोडे हिने प्रथम क्रमांक मिळवत जिल्हास्तर साठी पात्रता मिळविली

तसेच उत्कृष्ठ खेळी कायम ठेवत जलतरण या क्रीडा प्रकारात  १९ वर्षातील मुलांच्या गटात शंभर मीटर बटरफ्लाय व दोनशे मीटर बॅकस्ट्रोक या प्रकारात साहिल बोराडे अनुक्रमे प्रथम व द्वितीय क्रमांक मिळवला तर पन्नास मीटर बटरफ्लाय व शंभर मीटर बॅकस्ट्रोक या प्रकारात आदित्य राजवाडे अनुक्रमे प्रथम व द्वितीय क्रमांक मिळवला यासह शंभर मीटर फ्रीस्टाइल साहिल मढवई याने प्रथम क्रमांक मिळवला.तसेच  सतरा वर्षातील मुलांच्या सायकलिंग स्पर्धेत स्वराज राकेश भांबारे याने हि यशस्वी परंपरा कायम ठेवत द्वितीय क्रमांक मिळवला. या सर्व  विद्यार्थ्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

 सर्व विजयी स्पर्धकांचे संस्थेचे अध्यक्ष प्रवीण बनकर,सचिव माधव बनकर, शाळेचे प्राचार्य पंकज निकम यासह सर्व शिक्षकांनी अभिनंदन केले आणि पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. सर्व विजयी स्पर्धकांना शाळेचे क्रीडा शिक्षक दिपक देशमुख, गणेश मोरे यांचे मार्गदर्शन लाभले.
थोडे नवीन जरा जुने