कीर्तनकार हभप अनिल महाराज जमधडे यांचे अकाली निधन माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्याकडून शोक व्यक्त

कीर्तनकार हभप अनिल महाराज जमधडे यांचे अकाली निधन माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्याकडून शोक व्यक्त

युवा कीर्तनकार हभप अनिल महाराज जमधडे यांच्या निधनाने आध्यात्मिक क्षेत्राची मोठी हानी - छगन भुजबळ

येवला :- पुढारी वृत्तसेवा

येवला तालुक्यातील युवा कीर्तनकार हभप अनिल महाराज जमधडे यांचे उपचार सुरू असतांना निधन झाल्याची दु:खद बातमी मनाला चटका लावणारी आहे. त्यांच्या अकाली निधनाने आध्यात्मिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे, अशा शोकभावना राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केल्या आहे.

छगन भुजबळ यांनी शोकसंदेशात म्हटले आहे की,  ज्ञानराज वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तसेच येवला तालुक्यातील प्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प अनिल महाराज जमधडे यांचे संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणासोबतच आध्यात्मिक क्षेत्राची आवड निर्माण करत चांगले विद्यार्थी घडविण्याचे काम सुरू होते. संस्थेच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम देखील त्यांच्याकडून राबविण्यात येत होते. नुकताच त्यांनी शहीद जवानांच्या स्मृतिसाठी हरिनाम सप्ताह आयोजित केला होता आणि त्यानिमित्ताने त्यांची भेट झाली होती.आज अचानक त्यांच्या निधनांचे वृत्त कळाले. अतिशय दु:ख झाले. त्यांच्या निधनाने वारकरी पंथाची मोठी हानी झाली आहे. 

मी व माझे कुटुंबीय जमधडे परिवार व ज्ञानराज वारकरी शिक्षण संस्थेच्या कुटुंबियांच्या दु:खात सहभागी असून ईश्वर मृताच्या आत्म्यास  चिरशांती देवो हीच प्रार्थना करतो असे छगन भुजबळ यांनी शोक संदेशात म्हटले आहे.
थोडे नवीन जरा जुने