बनकर पाटील शैक्षणिक संकुला तर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री श्रीमती हिराबेन मोदी यांना श्रद्धांजली अर्पण

बनकर पाटील शैक्षणिक संकुला तर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री श्रीमती हिराबेन मोदी यांना श्रद्धांजली अर्पण
येवला : पुढारी वृत्तसेवा
भारत देशाचे विद्यमान पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या मातोश्री श्रीमती हिराबेन मोदी यांचे वृद्धापकाळाने वयाच्या १०० व्या वर्षी निधन आज झाले. त्यांना बनकर पाटील संकुलाकडून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
विद्यार्थ्याना मातृतुल्य कै. हिराबेन मोदी यांची  ओळख दीपक देशमुख यांनी करून दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हे दुःख सहन करण्याचे बळ मिळो ही ईश्वर चरणी प्रार्थना यावेळी करण्यात आली.  यावेळी अध्यक्ष प्रवीण बनकर , प्राचार्य पंकज निकम, प्राचार्य डॉ. जयप्रकाश कोकणे , पंकज मेटकर , रुपाली चव्हाण,दिपाली जाधव, स्मिता भावसार,शुभदा रसाळ, योगिता शिंदे,ममता परदेशी,वृषाली पानगव्हाणे ,भावना करंडे , स्मिता माळी, सौ. काळे, वैष्णवी पटेल, यासह   पंकज मढवई,योगेश काळे, मयूर पिंगळे, श्री दाते, शरद तांदळे, विकास मोरे, योगेश बोराळे,हे शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते. 

टिप्पणी पोस्ट करा

Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

थोडे नवीन जरा जुने