येवल्यात काँग्रेसची पतंग उडाली ! येवल्यात काँग्रेसची पतंग पुन्हा भरारी घेणार - प्रदेश उपाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे.


 येवल्यात काँग्रेसची पतंग उडाली !

 येवल्यात काँग्रेसची पतंग पुन्हा भरारी घेणार - प्रदेश उपाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे.

येवला : पुढारी वृत्तसेवा
 
येवल्यात काँग्रेस पक्षातर्फे शहराध्यक्ष प्रीतम पटणी यांच्या घराच्या छतावर पतंगोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे, प्रदेश सचिव रमेश कहांडोळ, युवक कॉग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष भारत टाकेकर, जिल्हा सरचिटणीस भैय्यासाहेब देशमुख यांनी हजेरी लावून पतंग उत्सवाचा आनंद घेतला.
       यावेळी पानगव्हाणे म्हणाले की येवल्यात काँग्रेस पक्षाने चांगले संघटन उभारले असून येणाऱ्या  स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कॉंग्रेस पक्षाचीच सत्ता येईल. 
यावेळी कॉंग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब मांजरे, तालुकाध्‍यक्ष ॲड.समीर देशमुख, शहराध्यक्ष प्रीतम पटणी, निराधार निराश्रित कॉंग्रेस विभागाचे जिल्हाध्यक्ष सुरेश गोंधळी, निवृत्ती लहरे, जिल्हा उपाध्यक्ष रश्मी पालवे, डॉक्टर सेल जिल्हाध्यक्ष डॉ. नीलम पटणी, बळीराम शिंदे, तालुका कार्याध्यक्ष सुकदेव मढवई, तालुका संघटक अण्णासाहेब पवार, राजे आबासाहेब शिंदे, शहर सरचिटणीस मुकेश पाटोदकर, तालुका सरचिटणीस दत्तात्रय चव्हाण, अमित पटणी, भास्कर पालवे, पंकज शहा, पंकज पटणी, एन.एस.यु.आय. तालुकाध्यक्ष अक्षय शिंदे, स्नेहल पटणी, अशोक नागपुरे, शेखर मेहता, सचिन पटणी, श्रेहंस पटणी, वैभव मेहता,  दिलीप पटणी,  सचिन पटणी,  आत्मेश पटणी, विजय पटणी, आदीसह उपस्थित होते.
थोडे नवीन जरा जुने