विद्यार्थ्यांतील टेक्नॉलॉजी कौशल्यासह सर्वांगीण विकासाला प्राध्यान्य! रुपेश दराडे : एसएनडी पॉलिटेक्निकमध्ये आय.एस.टी.ई.स्टुडन्ट चाप्टरचे अनावरण

विद्यार्थ्यांतील टेक्नॉलॉजी कौशल्यासह सर्वांगीण विकासाला प्राध्यान्य!
रुपेश दराडे : एसएनडी पॉलिटेक्निकमध्ये आय.एस.टी.ई.स्टुडन्ट चाप्टरचे अनावरण


येवला : पुढारी वृत्तसेवा

ग्रामीण भागातील विध्यार्थांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आम्ही नेहमीच विविध उपक्रम राबविण्याला प्राधान्य देतो.आयएसटीईचे स्टुडन्ट चाप्टरचे व्यासपीठ हे विध्यार्थांसाठी अतिशय उपयुक्त असून कौशल्य सिद्ध करण्याची संधी मिळणार आहे.या माध्यमातून विद्यार्थ्यांना टेक्नॉलॉजीत उत्तम शिकण्याची कौशल्ये आणि व्यक्तिमत्व विकसित करण्यासाठी मार्गदर्शन आणि प्रशिक्षण मिळणार आहे असे प्रतिपादन जगदंबा शिक्षण संस्थेचे कार्यकारी संचालक रुपेश दराडे यांनी केले. 
जगदंबा शिक्षण संस्थेच्या एस.एन.डी.पॉलिटेक्निकमध्ये आय.एस.टी.ई. स्टुडन्ट चाप्टर,एनपीटीएल लोकल चाप्टर व आयआयसी विभागाचे अनावरण मोठ्या उत्साहात करण्यात आले.उद्योग,इतर संस्थांना आवश्यक असलेले उच्च दर्जाचे व्यावसायिक डिप्लोमा अभियंते आणि तंत्रज्ञांच्या निर्मिती आणि विकासामध्ये सहाय्य आणि योगदान देण्यासाठी हा उपक्रम महाविद्यालयाने राबविला आहे.
या वेळी प्रमुख पाहुणे असलेले संस्थेचे संचालक रुपेश दराडे,प्राचार्य उत्तम जाधव,विभागप्रमुख सतीश राजनकर,प्रा.ज्ञानेश्वर धनवटे,प्रा.गणेश चव्हाण,प्रा.शोराब शेख,प्रा. संतोष खंदारे, प्रा. संदीप असुदे आदींच्या हस्ते सरस्वती पूजन करण्यात आले.पॉलिटेक्निकचे आयएसटीई समन्वयक प्रा. संदीप असुदे यांनी कार्यक्रमाची रूपरेष सांगितली.यावेळी आयएसटीई कडून मिळालेल्या प्रमाणपत्रांचे मान्यवरांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.सभासद झालेल्या विध्यार्थांना ओळखपत्रांचे वाटप करण्यात आले. समन्वयक संदीप असुदे यांनी  विध्यार्थांना आयएसटीई ची व्यापकता व त्याचे असणारे फायदे,त्यांची कार्यपद्धती याविषयी मार्गदर्शन केले. 
प्राचार्य उत्तम जाधव यांनी पॉलिटेक्निकच्या विध्यार्थांना देशपातळीवर आपल्या संकल्पना मांडण्याचे व्यासपीठ मिळणार असून विध्यार्थी विविध मार्गांने टेक्निकल विषय व संकल्पना आयएसटीईच्या माद्यमातून  कसे मांडू शकतात व त्यापासून विध्यार्थांना भविष्यात होणारे फायदे याविषयी मार्गदर्शन केले.प्रा.सतीश राजनकर यांनि उद्देश विध्यार्थांना समजावून सांगितल.प्रा.संतोष खंदारे यांनी आभार मानले.

बाभूळगाव : एसएनडी पॉलिटेक्निकमध्ये  स्टुडन्ट चाप्टरचे अनावरण प्रसंगी जगदंबा शिक्षण संस्थेचे कार्यकारी संचालक रुपेश दराडे.प्राचार्य उत्तम जाधव आदी.
थोडे नवीन जरा जुने