शिवजन्मोत्सव दीपोत्सवाने साजरा


शिवजन्मोत्सव दीपोत्सवाने साजरा 


येवला- पुढारी वृत्तसेवा
 येथे ज्ञानराज फाउंडेशन च्या वतीने शिवजन्मोत्सव छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या भोवती रांगोळी व पणत्यांची आरास करून दीपोत्सवाने साजरा करण्यात आला.
 शहरातील टिळक मैदान येथे सायंकाळी दीपोत्सवासाठी शिवप्रेमी युवक, महिला व युवतींनी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसराची स्वच्छता केली व पुतळ्याभोवती आकर्षक रांगोळी सजावट करून पणत्या लावल्या.
 ज्ञानराज फाउंडेशनच्या वतीने गेल्या आठ वर्षांपासून हा उपक्रम राबविला जात आहे. याशिवाय फाऊंडेशनने शिवचरित्र व्याख्यान, रक्तदान शिबिर, दुर्गभ्रमंती, प्लास्टिक मुक्ती अभियान, पथनाट्य-सांस्कृतिक कार्यक्रम आदी उपक्रमांचे आयोजन केले आहे.

यावेळी देवांश गोविंदराव भोरकडे, स्वरूप भोरकडे, दिवेश सोनवणे यांनी शिवजन्मोत्सव प्रसंगीचे भाषण केले, शिवगर्जना - आराध्या काटे, शिवमुद्रा - अंश प्रतीक जाधव, पोवाडा - अर्णव भोरकडे, भाषण- हरप्रीत पंजाबी यांनी सादरीकरणाने छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देत उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.

याप्रसंगी हरीभाऊ बडवर, सचिन सोनवणे, भुषण शिनकर, डॉ.अलंकार गायके, डॉ.रामदास खोकले, डॉ.धनराज काटे, डॉ.प्रतीक जाधव, पुरूषोत्तम भोरकडे, अमोल उदावंत, डॉ.जयप्रकाश करवा, राकेश छताणी, करूणा खोकले, सौ.मनिषा भोरकडे, सुनंदा भोरकडे, रजनी बडवर, अमोल उदावंत, राहुल जाधव, निखिल दाभाडे, राधिका भोरकडे आदी उपस्थित होते.

सुत्रसंचलन प्रा.सौ.रोहिणी भोरकडे, रंजना काटे यांनी केले. सचिन सोनवणे यांनी मनोगत व्यक्त केले तर डॉ.गोविंद भोरकडे यांनी ज्ञानराज फाउंडेशनच्या कार्याबद्दल माहिती दिली.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ज्ञानराज फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ.गोविंदराव भोरकडे, डॉ. संतोष जाधव, प्रा.सौ. रोहिणी भोरकडे, सौ.रंजना काटे, सौ.सोनाली बडवर, डॉ.सौ.जयश्री जाधव आदींनी प्रयत्न केले.
थोडे नवीन जरा जुने