नगर मनमाड महामार्ग वरील बाजार समिती समोरील चौकास क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले हे नाव देण्यात यावे:- महेश गादेकर यांचे येवला नगरपालिकेस निवेदन

नगर मनमाड महामार्ग वरील बाजार समिती समोरील चौकास क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले हे नाव देण्यात यावे:- महेश गादेकर यांचे येवला नगरपालिकेस निवेदन

येवला : 

 येवला शहरातील नगर मनमाड महामार्ग वरील बाजार समिती समोरील चौकास क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले हे नाव देण्यात यावे असे याबाबत लेखी निवेदन येवला नगरपरिषद मुख्याधिकारी तथा प्रशासक  नागेंद्र मुतकेकर यांना राष्ट्रवादीचे युवा नेते  महेश गादेकर यांनी  दिले.  महात्मा फुले यांनी शेतकरी कष्टकरी दिन दुबळ्यांच्या उद्धारासाठी अहोरात्र प्रयत्न केले. समाज सुधारण्याकरिता आयुष्य वेचले शेतकरी सुधारण्याकरिता ब्रिटिशांनी शेतकऱ्यांची कशी लूट करतात यासाठी शेतकऱ्यांचा आसूड हा ग्रंथ लिहिला . त्यामुळे राष्ट्रवादीचे युवा नेते तसेच सर्व शेतकरी कष्टकरी गोरगरीब जनता यांची गेल्या कित्येक दिवसापासून इच्छा होती म्हणून 11 एप्रिल महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीचे  औचित्य साधून राष्ट्रवादीचे युवा नेते महेश गादेकर यांनी शहरवासीयांना सोबत घेऊन मुख्याधिकारी यांना निवेदन दिले .
यावेळी  युवा नेते महेश गादेकर यांच्या समवेत अरुण गायकवाड, मनोज थळकर, नारायण पैठणकर ,विजय निकम, अमोल गायकवाड ,मयूर थळकर, रोशन थळकर, अनिकेत गायकवाड, पवन गादेकर आक्षय गायकवाड ,राहुल जाधव ,अक्षय गायकवाड आदी उपस्थित होते.
थोडे नवीन जरा जुने